पोलीसनामा ऑनलाइन टीम – Gauri Kulkarni | छोट्या पडद्यावरील अनेक मालिका सध्या रंजक वळणावर दिसत आहेत. या मालिका प्रेक्षकांना धरून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. सध्या ही मालिका चांगलीच गाजली आहे. या मालिकेतील अरुंधती या पात्रासोबतच इतर पात्रही तेवढेच लोकप्रिय आहेत. याच मालिकेतील गाजलेले एक पात्र म्हणजे गौरी (Gauri Kulkarni). मालिकेत गौरी हे पात्र अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही साकारत आहे. आता गौरी एका नव्या मालिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आई कुठे काय करते या मालिकेमध्ये गौरी आणि यशच्या आयुष्यात एक मोठी घटना दाखवण्यात आली होती. यानंतर कित्येक दिवस गौरी मालिकेत दिसत नव्हती. तर आता मिळालेल्या माहितीनुसार गौरी लवकरच सन मराठी वरील नव्याने सुरू होणाऱ्या ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत झळकणार आहे. गौरी कुलकर्णी ही या मालिकेत नक्की कोणती भूमिका साकारणार याविषयी अद्याप तरी अधिक माहिती समोर आलेली नाही. परंतु चाहते मात्र गौरीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
जर गौरी कुलकर्णीने (Gauri Kulkarni) आई कुठे काय करते या मालिकेतून एक्झिट घेतली असेल
तर तिच्या जागी पुन्हा त्या मालिकेत एक नवीन पात्र पाहायला मिळणार की गौरी हे पात्र कायमचे काढून टाकणार
याकडे देखील चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
गौरीने आजवर आपल्या अभिनयासोबत लूकने देखील स्वतःची एक वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे.
Web Title :- Gauri Kulkarni | aai kuthe kay karte fame gauri kulkarni will enter in sun marathi new serial premas rang yave
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
U19 Womens World Cup | सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…