गौरी लंकेश हत्याकांड : पिस्तुल व शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण शेतात

बेंगळुरू: वृत्तसंस्ठा

पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी गेल्या आठवड्यात एसआयटीनं अटक केलेल्या भारत कुर्णे यांच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक व महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका डॉक्टरसह जवळपास सहा जणांनी लंकेश यांची हत्या करण्यासाठी बेळगावातील जांबोटी गावामधील एका शेतात पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. आरोपी भारत कुर्णे याच्या मालकीच्या शेतात मारेकऱ्यांना पिस्तुल आणि इतर शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. भारत कुर्णे याच्या शेतात केवळ एअर गनचेच नाही, तर खऱ्या बंदूक व काडतुसांचा वापर करण्याचेही प्रशिक्षण देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

गेल्या महिन्यात मदिकेरी येथून अटक केलेला राजेश बंगेरा हा त्यांच्याकडून सराव करून घेत होता , हेही चौकशीतून उघड झालेलं आहे .राजेश बंगेरा एका स्थानिक राजकीय व्यक्तीचा तो स्वीय सहायक आहे. राष्ट्रीय तपास पथकाने मोस्ट वांटेड म्हणून जाहीर केलेला कोल्हापूरचा प्रवीण लिमकरसुद्धा त्याच्या शेतात येऊन गेल्याची माहिती विशेष तपास पथकाला (एसआयटी) मिळाली आहे.एनआयए, महाराष्ट्र एसआयटी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बेळगाव, गोवा व महाराष्ट्राच्या सीमाभागातील जंगलात युवकांना ते बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण देत होते, अशी माहिती भारत कुर्णे याच्या चौकशीतून पुढे आली आहे. नरेंद्र दाभोलकर यांची हत्येपूर्वी दोन-तीन महिन्यांआधी म्हणजेच एप्रिल-मे २०१३मध्ये मारेकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. लंकेश यांच्या डोक्यात गोळी घाला, असं मारेकऱ्यांना सरावादरम्यान सांगण्यात आलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं.
[amazon_link asins=’B01N6OOW52′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’896a387a-a216-11e8-8cd8-d78b19fab9ca’]
ताब्यात घेण्याबद्दल उद्या निकाल
भारत कुर्णे यास एसआयटीच्या ताब्यात द्यायचे किंवा नाही याची तृतीय एसीएमएम न्यायालयाने सुनावणी करून निकाल सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे. एसआयटीची न्यायालयात बाजू मांडणारे विशेष सरकारी अभियोजक श्रीशैल वडवडगी यांनी, संशयिताला गोवा, पुणे व महाराष्ट्रात चौकशीसाठी घेऊन जावयाचे आहे तसेच त्याच्या शेतात बंदुकीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, असा दावा केला.
[amazon_link asins=’B07FP45DR3,B0756W2GWM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’71584337-a216-11e8-a2ee-cb2d9ca694ac’]