पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी एस.आय.टी. चा बुरखा फाटला !

कर्नाटक : वृत्तसंस्था

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटकेत असलेले परशुराम वाघमोरे आणि मनोहर एडवे या दोघांनी आज प्रसारमाध्यमांना अत्यंत गंभीर मुद्दे सांगितले. या हत्या प्रकरणात अटक केलेल्यांची यापूर्वी आमची कोणाचीही ओळख नव्हती. आम्हाला या प्रकरणात मुद्दामहून लक्ष्य केले जात असून कोर्‍या कागदांवर स्वाक्षरी घेण्यास आमच्यावर कर्नाटकच्या विशेष तपास पथकाकडून दबाव आणला जात आहे. या हत्येप्रकरणी गुन्हा मान्य करा, त्या बदल्यात आमच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये देऊ, असेही त्यांनी सांगितले. आम्हाला या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. जर आम्ही स्वाक्षरी केली नाही, तर आमच्या कुटुंबियांनाही या प्रकरणात ओढणार असल्याची, तसेच आम्हाला जीवे मारण्याचीही धमकी या तपास पथकाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढे आमच्या जिवाला काही झाल्यास त्याला विशेष तपास पथक जबाबदार असेल, असे म्हटले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16b26aa1-c3f7-11e8-a9af-b149562c9611′]
यावरूनच कर्नाटक विशेष तपास पथकाचे अन्वेषण किती संशयास्पद आणि षड्यंत्रपूर्वक चालू आहे, हेच दिसून येते. यापूर्वीही महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख राकेश मारिया यांच्यावर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या आणि नंतर जामिनावर सुटलेल्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना 25 लाख देतो, गुन्हा कबूल करा, असे गंभीर आरोप केले होते. कॉ. पानसरे हत्या प्रकरणातही समीर गायकवाड यांनाही पैशाचे आमीष दाखवून गुन्हा कबूल करण्यास दबाव आणला गेला होता. आता गौरी लंकेश हत्या प्रकरणातही 25 लाख रुपयांचे आमीष दाखवून संशयितांवर दबाव आणला जात आहे. या हत्यांच्या प्रकरणात तपास यंत्रणा येनकेन प्रकारेण सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे नाव यावे, यासाठी संशयितांवर दबाव आणत आहेत, असेच दिसून येते. परशुराम वाघमोरे आणि मनोहर एडवे यांना 25 लाख रुपयांचे आमीष दाखवणारी व्यक्ती कोण आहे ? सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना या प्रकरणांत अडकवण्याचे षड्यंत्र कोण रचत आहे ? या सर्वांमागे कोणता अदृश्य हात आहे ? कोण मास्टरमाईंड आहे ?, याची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने शासनाकडे केली आहे.

जाहिरात