इंदापूरात गौरींचे पारंपारीक वाद्याच्या गजरात स्वागत

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – गुरूवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील प्रत्येक घरोघरी गौरींचे आगमन झाले. गौरींना सुवासीनिंनी हळदी कुंकु लावुन पारंपारीक वाद्य, परात (पितळी) हे वाद्य वाजवत, आली आली लक्ष्मी, कशाच्या पायी, गुरा-ढोरांच्या पायी, धनसंपत्तीच्या पायी असे पौराणीक गाणे म्हणत सुवासींनिच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

गौरीं घरामध्ये विराजमान झाल्यानंतर भाजी भाकरीचा नैव्यद्य करण्यात आला. त्यानंतर गौरींची मोठ्या प्रमाणात सजावट करून शक्रवारी पारंपारीक पुरण पोळीचा नैवद्य दाखवुन आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली. गौराईंच्या पुढे करण्यात आलेली वेगवेगळ्या पदार्थांची आरास व त्या माध्यमातुन पर्यावरण पूर्वक देण्यात येणारे संदेश यामुळे घरी येणारा प्रत्येक पाहुणा व गौरी भक्त भारावून गेल्याचे दीसुन येत होते.

इंदापूर शहरातील सावतामाळीनगर येथिल अंकुश राऊत यांनी गौरीसमोर आरास करताना पर्यावरणपूर्वक देखावा सजावट करून झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याचा अपव्यय टाळा, व पाणी जपून वापरा, एक मुल एक झाड घरोघरी लावा, मुलीच्या जन्माचे स्वागत करावे अशा प्रकारचा सामाजीक संदेश देणारा देखावा सादर केला आहे. चांगला सामाजीक संदेश देणारा देखावा सजावट सादर केला असुन शहरात अंकुश राऊत यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. शहरात गौरींचे आगमन झाल्यानंतर गौराई पाहण्यासाठी घरोघरी नागरीकांची गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत होते.

आरोग्यविषयक वृत्त –