अदानी-अंबानींच्या कंपन्यांचा ‘धनवर्षाव’, शेअरहोल्डर झाले मालामाल !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मुकेश अंबानी यांचा रिलायन्स ग्रुप आणि गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपचे अनेक शेयर असे आहेत, ज्यांनी मागील एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना इतके जास्त रिटर्न दिले आहे की, ते विचारही करू शकत नव्हते. या शेयरमध्ये गुंतवणुकीमुळे गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत. उदाहरणार्थ अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीनने एक वर्षात सुमारे 1265 टक्के रिटर्न दिले आहे.

मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर अदानी ग्रीन एनर्जीचे शेयर सुमारे 5 टक्के वाढीसह 670.65 रुपयांवर पोहचले. हा या शेयरमधील मागील एक वर्षातील सर्वात उच्चस्तर आहे. कंपनीचे मार्केट कॅप वाढून 1,04,890.62 कोटी रूपयांपर्यंत पोहचले आहे.

या वर्षी 1 जानेवारीला या शेयरची किंमत 175 रुपयांच्या जवळपास होती. म्हणजे जानेवारीपासून आतापर्यंत आतापर्यंत सुमोर साडेआठ महिन्यात या शेयरने सुमारे 282 टक्के रिटर्न दिले आहे. 17 ऑगस्टला या शेअरचा भाव सुमारे 366 रुपये होता. अशाप्रकारे एक महीन्याच्या आत अदानी ग्रुपच्या या शेयरने गुंतवणुकदारांना सुमारे 83 टक्के रिटर्न दिले आहे. या वर्षी जून तिमाहीत कंपनीने 21.75 कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला आहे.

रिलायन्स सुद्धा कमी नाही
गुंतवणुकदारांना हैराण करणारा दुसरा शेयर हा देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज सतत यशाकडे वाटचाल करत आहे. यामुळे मुकेश अंबानी श्रीमंतीच्या पायर्‍या चढत आहेत, तर कंपनीचे शेयरधारक सुद्धा मालामाल होत आहेत.

मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेयरची किंमत 2317 रुपयांपर्यंत पोहचली. 14 सप्टेंबरला ही कंपनी सर्वकालिन उंचीवर 2360 रुपयांवर होती. एक वर्षापूर्वी 16 सप्टेंबरच्या जवळपास या शेयरची किंमत 1200 रुपये होती. म्हणजे कंपनीच्या शेयरने यावर्षात गुंतवणुकदारांना सुमारे 93 टक्के रिटर्न दिले आहे.

या वर्षात 23 मार्चला हा शेयर आपल्या सर्वात खालच्या स्तरावर 875.70 रुपयांवर पोहचला होता. म्हणजे मागील सुमारे सहा महिन्यात या शेयरने गुंतवणुकदारांना सुमारे 165 टक्के रिटर्न दिले आहे.

देशातील इतर कंपन्या त्रस्त असताना रिलायन्स ग्रुप पुर्णपणे तेजीत आहे. फेसबुकसह एक डझनपेक्षा जास्त कंपन्यांनी रिलायन्स गु्रपची कंपनी जियो प्लॅटफॉर्ममध्ये सुमारे 1.52 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.

यानंतर आता ग्रुपची अन्य कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणुकीची स्पर्धा सुरू झाली आहे. सिल्व्हर लेक पार्टनर्सने यामध्ये 7500 कोटी रुपयांची गुंतवणुक करण्याची घोषणा केली आहे. तर अन्य कंपन्या रांगेत उभ्या आहेत.