१४ स्पा सेंटरमधील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ ; १० युवक, फॉरेनरसह २५ युवतींना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोएडा येथील सेक्टर १८ मधील १४ स्पावर पोलिसांनी रविवारी रात्री एकाचवेळी छापे घातले. त्यात स्पाच्या नावाखाली चाललेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणला असून ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात २५ महिला आणि १० पुरुषांचा समावेश आहे. त्यामध्ये काही परदेशी महिलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

देशातील वेगवान प्रगती झालेला भाग म्हणून नोएडा समजला जातो. त्या ठिकाणी आयटी पार्क तसेच अनेक सेवा क्षेत्रातील कंपन्या, मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांची कार्यालये, स्टुडिओ आहेत. अतिशय हायफाय वातावरण असलेल्या या परिसरात अनेक धंदे सुरु झाले आहेत. पोलिसांनी स्पाच्या नावावर चाललेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणला आहे. पोलिसांच्या १५ टीमनी एकाचवेळी गौतमबुद्ध नगर भागातील सेक्टर १८ मधील १४ स्पावर रविवारी रात्री छापा घातला.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा यांच्या नेतृत्वाखालील ३० सर्कल अधिकारी, ८ पोलीस स्टेशनचे अधिकारी, ३० उपनिरीक्षक आणि पुरुष व महिला काँस्टेबल यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यात १ लाख रुपयांची रोकड, बीअर, वापरलेले आणि न वापरलेले कंडोम व इतर आक्षेपार्ह साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत.

स्पा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गोष्टी चालत असल्याचे उघड झाले असून त्यांच्या मालकांवर उत्तर प्रदेश गँगस्टर अ‍ॅक्टखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे गौतम बुद्ध नगरचे पोलीस अधीक्षक विनित जैस्वाल यांनी सांगितले.

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like