गौतम बुद्धांनी समाजात बदलाची पायाभरणी केली – प्रा. अनिल वाव्हळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बौद्ध पौर्णिमा ही केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांत साजरी केली जातो. यात श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, नेपाळ, थायलंड, मलेशिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे. श्रीलंकेमध्ये बुद्ध पौर्णिमेला ‘वेसाक’ असं म्हणतात. हा वैशाखचा अपभ्रंश आहे. गौतम बुद्धांनी त्यांना मिळालेले ज्ञान समाजापर्यंत नेऊन एका वेगळ्याच बदलाची पायाभरणी केली होती. त्याकाळी समाजात माजलेलं अवडंबर, पशूबळी, नरबळींसह वैदिक कर्मकांडाचा विरोध केला. मानव कल्याणाचा उपदेश केला. लोकांमध्ये स्वर्ग आणि नर्क या भंपक गोष्टींबद्दल असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. ते महान गुरू होते, असे मत प्रा. अनिल व्हावळ यांनी व्यक्त केले.

हडपसरमधील गांधी चौकामध्ये गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पथारी संघटनेचे मोहन चिंचकर, धनगर उन्नती मंडळ अनिल धायगुडे, विक्रम आल्हाट, सतिश आल्हाट, बाळासाहेब तुपे, संतोष ससाणे, निरंजन घुगे आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्व. अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान, इंदुबाई वाडकर प्रतिष्ठान जन गर्जना मंचच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महेंद्र बनकर यांनी आभार मानले.