पंचायत निवडणुक लढविणार गुंडाची पत्नी, महिनाभरापूर्वीच तुरूंगातून पती अनिल दुजानाची झाली होती सुटका

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कुख्यात गुंड अनिल दुजानाची पत्नी पूजा नागरने गौतम बुध नगरच्या जिल्हा पंचायत प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. शनिवारी गौतम बुध नगर जिल्हा पंचायतीतून निवडणूक लढविण्यासाठी नो ड्यूज सर्टिफिकेटही मिळविले आहे. असा विश्वास आहे की, रविवारी किंवा सोमवारी पूजा जिल्हा पंचायत सदस्यासाठी फॉर्म भरेल.

गेल्या पंचायत निवडणुकीत कुख्यात अनिल दुजाना नेही या प्रभागातून निवडणूक लढविली होती. यावेळी, गँगस्टरची पत्नी पूजा नागर निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत. दुजानाचे वकील आणि त्याच्या साथीदारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या महिन्यापासून अनिल दुजाना किंवा त्याची पत्नी गौतम बुध नगर जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक लढवणार असल्याची अटकळ सुरू होती. आता यावर शिक्कामोर्तब झाला की, दुजानाची पत्नी पूजा नागर जिल्हा पंचायतची निवडणूक लढवणार आहे.

अनिल दुजाना हा गौतम बुध नगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. दुजानावर 20 हून अधिक खून, दरोडे, आणि प्राणघातक हल्ल्यांचा समावेश आहे. 2011 मध्ये, अनिल दुजाना गँगने साहिबाबाद येथे लग्न समारंभात गोळीबार केला, त्यात तीन लोकांचा मृत्यू झाला. नुकताच एक महिन्यांपूर्वी कोर्टाकडून जामीन मिळवल्यानंतर अनिल दुजानाने पूजाशी लग्न केले. तर, अनिल आणि पूजाचा साखरपुडा दीड वर्षापूर्वीच झाला होता.

दरम्यान, गँगस्टर अनिल दुजाना एक महिन्यापूर्वी तुरूंगातून सुटला होता. पूर्वी अनिल दुजाना तुरुंगात असतानाही जिल्हा पंचायत निवडणुकीत विजयी झाला. अशा परिस्थितीत पत्नी निवडणुकीच्या क्षेत्रात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे.