प्रभू श्रीराम यांच्यानंतर आता गौतम बुद्धांबद्दल नेपाळचं मोठे विधान , म्हणाले – ‘ते येथेच जन्मले होते’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अयोध्या आणि देवाबद्दल वक्तृत्व बोलल्यानंतर नेपाळने आता गौतम बुद्धांविषयी विधान केले आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी आपल्या निवेदनात म्हटले की, ऐतिहासिक आणि पुरातत्व पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे कि, गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला होता. गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी ही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. यासह, प्रवक्त्याने म्हटले की, हे सत्य आहे कि बौद्ध धर्म नेपाळनंतर जगाच्या इतर भागात पसरला. ही बाब शंका आणि वादाच्या पलीकडे आहे आणि म्हणून हा वादाचा विषय होऊ शकत नाही. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला याची जाणीव आहे.

यासह नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा दावा केला की, भगवान राम यांचे जन्मस्थान नेपाळमधील चितवन जिल्हा आहे. याच जिल्ह्यात माडी नगरपालिका क्षेत्र आहे, ज्याचे नाव अयोध्यापुरी आहे. शनिवारी ओली यांनी तेथील अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. त्यांना राम, लक्ष्मण आणि माता सीतेच्या मूर्ती बसवण्याचे आदेश देण्यात आले. ओली यांनी अधिकाऱ्यांना अयोध्यापुरीला वास्तविक अयोध्या म्हणून प्रोजेक्ट करण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे आदेश दिले. थोरी व माडी येथील स्थानिक प्रतिनिधींना भव्य मंदिर बांधण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही पंतप्रधान ओली यांनी दिल्या आहेत.

अधिकाऱ्यांशी दोन तास केली चर्चा
नेपाळीच्या एका वृत्तपत्रानुसार, ओली यांनी माडी आणि चितवनमधील अधिकारी आणि नेत्यांशी दोन तास फोनवर संवाद साधला. पुढील चर्चेसाठी त्यांना काठमांडू येथे बोलविण्यात आले. ओली म्हणाले, ‘माझा विश्वास आहे की भगवान रामचा जन्म नेपाळच्या अयोध्यापुरी येथे झाला होता. भारताच्या अयोध्येत नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, जे हे सिद्ध करतील की भगवान रामांचा जन्म नेपाळमध्ये झाला होता. चितवन जिल्ह्यातील खासदार दिलकुमारी रावल म्हणाल्या, ‘पंतप्रधान ओली यांनी अयोध्यापुरीच्या आसपासच्या भागांच्या संरक्षणासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे सांगितले. तसेच पुरावे गोळा करण्यासाठी अयोध्यापुरी खोदण्यास सांगितले. यासह, अयोध्यापुरीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तेथील ऐतिहासिक पुरावे जपण्यासाठी स्थानिक लोकांना मदत करण्याचे आदेश दिले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like