भाजप खासदाराचे MS धोनीवर ‘गंभीर’ आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2011 ला झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक बनवण्यापूर्वीच बाद होण्याला गौतम गंभीरने कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला कारणीभूत धरले आहे. याबाबतचा खुलासा स्वतः गंभीरने केला आहे. त्यावेळच्या सामन्यातील गंभीरची खेळी निर्णायक ठरलेली होती. यावेळी गंभीरने 97 धावा बनवल्या होत्या.

एका मुलाखतीत गंभीरने सांगितले की प्रत्येक खेळाडू हा विश्वचषक जिंकण्याच्या हेतूनेच तयारी करत असतो आणि मला तश्या दोन संधी मिळाल्या सुद्धा असे गंभीर सांगतो. चांगले खेळूनही जर एखाद्या वेळेस मॅन ऑफ द मॅच मिळाली नाही तर प्रत्येक खेळाडूला त्याचे वाईट वाटते असे गंभीर सांगतो. तसेच ज्यावेळी अंतिम सामन्यात मी 97 धावांवर खेळत होतो त्यावेळी मनात काय सुरु होते असे अनेकज मला विचारतात, मात्र त्यावेळी मी माझ्या धावसंख्येकडे लक्ष देऊन नव्हतो परंतु धोनीने मला सांगितले की, शतकासाठी तीन धावा लागताहेत. तसेच धोनीने यावेळी मला शतक पूर्ण करण्यासाठी सांगितले त्यावेळी डोक्यात शतकाबाबत विचार सुरु झाल्याचे गंभीरने सांगितले.

गौतम गंभीर म्हणाला, त्यावेळी खेळताना डोक्यात फक्त श्रीलंकेचा पराभव करणे एवढेच होते मात्र धोनीच्या वक्तव्याने माझे लक्ष शतकावर गेले. जर त्यावेळी माझे लक्ष विचलित झाले नसते तर कदाचित मी शतक देखील पूर्ण केले असते असे गंभीर सांगतो.या सामन्यात गंभीरने 97 धावा केल्या होत्या आणि तो बाद झाला होता मात्र महेंद्र सिंह धोनीने या सामन्यात 91 धावा केल्या होत्या आणि तो नाबाद राहिला होता. यामुळे धोनीलाच मॅन ऑफ द मॅचचा ‘किताब मिळाला होता.

या आधी देखील गौतम गंभीरने महेंद्रसिंह बाबत अशाच पराकारचे वक्तव्य केले होते. गंभीरने त्यावेळी सांगितले होते की, एका ऑस्ट्रेलियातील टूर दरम्यान धोनीचा सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांना एक साथ सामन्यात घेण्याबाबत विरोध होता. गंभीरने सांगितले की या तिरंगी सामन्यांसाठी तो आम्हाला एकसाथ खेळवू इच्छित नव्हता कारण 2015 च्या विश्वचषकाचे तयारी सुरु करायची होती.

एक प्रकारे आम्हाला 2012 मध्येच हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता की, 2015 च्या विश्वचषकाचा आम्ही हिस्सा असणार नाही असा खुलासा देखील गंभीरने त्यावेळी केला होता. तसेच गंभीरने हे देखील सांगितले की, तिरंगी मालिकेत भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका विजयाची गरज होती आणि त्यावेळी सचिन सेहवागने ओपनिंग केली होती. त्यानंतर मी खेळायला आलो होतो आणि भारताने 37 ओव्हरमध्ये तो सामना जिंकला होता.

सीरिजच्या सुरुवातीला आम्ही तिघे सोबत खेळलो नव्हतो आम्हाला रोटेट केले जात होते. जेव्हा विजयाची खूप आवश्यकता होती तेव्हाच आम्हा तिघांना धोनीने खेळवण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील गंभीरने यावेळी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com