Gautam Gambhir | आठवड्याभरात गौतम गंभीरला तिसऱ्यांदा मिळाली जीवे मारण्याची धमकी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gautam Gambhir | टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी (Death threats) देण्यात आली आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेकडून त्याला हा धमकीचा मेल आला आहे. या ईमेलमध्ये दिल्ली पोलिसांचाही उल्लेख करण्यात आला आहे. [email protected] या ईमेल आयडीवरून हा मेल पाठवण्यात आला आहे.

 

या मेलमध्ये दिल्ली पोलीस आणि IPS श्वेता आमचं काहीही करू शकणार नाहीत. पोलिसांमध्येच आमचे खबरी आहेत. या खबरींकडूनच तुझी सर्व माहिती मिळत आहे ‘ असा दावा या मेलमध्ये करण्यात आला आहे. याअगोदर गौतम गंभीरला (Gautam Gambhir) मंगळवारी रात्री धमकीचा मेल आला होता. यानंतर गौतम गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती डीसीपी सेंट्रल श्वेता त्रिपाठी (DCP Central Shweta Tripathi) यांनी दिली आहे.

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) 2007 साली झालेला T20 वर्ल्ड कप (T20 World Cup)
आणि 2011 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये (One-Day World Cup) महत्वाची भूमिका पार पाडली होती.
या दोन्ही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्यानं टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन केले होते.
तसेच गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलमध्ये (IPL) दोनदा ट्रॉफी जिंकली होती.
यानंतर गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
तसेच गंभीरनं 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला.
सध्या तो पूर्व दिल्लीचा (East Delhi) भाजपा (BJP) खासदार आहे.

 

Web Title :- Gautam Gambhir | former cricketer and bjp mp gautam gambhir received third threat e mail from isis kashmir delhi police also mentioned

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malaika Arora | मलाईकानं ‘स्पोर्टस् ब्रा’मध्ये काढला मिरर सेल्फी, तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांचा वाढला ‘पारा’

Nawab Malik | ‘पब, पार्टी आणि पेंग्विनमुळे महाराष्ट्राची बदनामी’ ! आशिष शेलारांच्या टीकेला नवाब मलिकांचे जोरदार प्रत्युत्तर; दिला ‘हा’ इशारा

EPFO | ‘हे’ कागदपत्र जमा केले नाही तर पुढील महिन्यापासून PF ‘कटिंग’ होईल बंद, ‘या’ पध्दतीनं टाळा असुविधा

Sanjay Raut | संगीत सोहळयात वधूपिता संजय राऊतांचा सुप्रिय सुळेंसोबत ‘डान्स’, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)

Pune Crime | सैन्य दलाच्या वर्दीचा वापर करुन तरुणीवर लैंगिक अत्याचार, पुणे पोलिसांनी अहमदनगर येथून ‘लखोबा लोखंडे’च्या आवळल्या मुसक्या