Gautam Gambhir | माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gautam Gambhir | देशाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘इसिस काश्मीर’ (ISIS Kashmir) या संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गौतम गंभीर यांना धमकीचा मेल (Threat Mail) आला. त्यानंतर गंभीर यांनी तात्काळ दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत तात्काळ वाढ करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस (Delhi Police) याबाबत चौकशी करीत आहेत. (Gautam Gambhi received death threats from ISIS Kashmir)

 

आयएसआयएस काश्मीरकडून (ISIS Kashmir) धमकी आलीय. ई-मेलवरून ही धमकी पाठवण्यात आली असल्याचं देखील गंभीरने सांगितलं आहे. दहशतवादी संघटनेनं गंभीरला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अधिकृत ई मेल आयडीवर (मंगळवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास धमकीचा मेल आला असल्याचं गंभीरने (Gautam Gambhir) पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना इसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार केली आहे.
यानंतर गंभीर यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अशी माहिती दिल्लीच्या डीसीपी श्वेता चौहान (DCP Shweta Chauhan) यांनी दिली आहे.

 

Web Title :- Gautam Gambhir | former indian cricketer and bjp mp gautam gambhir received death threats email from isis kashmir says delhi police DCP central Shweta Chauhan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Cryptocurrency Bill 2021 | भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध ! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करणार क्रिप्टोकरन्सीसह 26 बिले (विधेयके)

Pune Crime | गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल व अमित गोयल यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल, बनावट खरेदी खताद्वारे SRA प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न

IND Vs PAK Cricket Series | भारत-पाकिस्तान सीरीजची योजना बनवत ‘हे’ क्रिकेट बोर्ड, चेयरमनने केला खुलासा

Sameer Wankhede | ‘NCB ने माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं’, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांचा (ACP) आरोप

WHO Europe Office | COVID मुळे यूरोपात होऊ शकतात आणखी 7 लाख मृत्यू, WHO ने हिवाळ्यासाठी दिला गंभीर इशारा

Pune Crime | जुन्या वाड्यात पकडलं? वडीलांशी जिव्हाळ्याच्या मैत्रीचे ‘संबंध’ असल्याच्या रागातून बहिण-भावानं महिलेला केलं ‘खल्लास’

ST Workers Strike | कोर्टाचा निर्णय येईपर्यंत पर्यायी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील, कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्र्यांचे आवाहन