धोनीला सचिन, सेहवाग आणि मी एकाचवेळी संघात नको होतो ; ‘या’ खेळाडूचा खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा होत असताना त्यावर भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने भाष्य केले आहे. गौतम गंभीरने राजकारणात जरी प्रवेश केला असला तरी क्रिकेटमधील महत्वाच्या मुद्द्यावर तो भाष्य करत असतो. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा देखील जोर धरत आहेत. महेंद्रसिंग धोनी हा वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्त होईल, असे बोलले जात होते. मात्र अजूनपर्यंत धोनीने याविषयी काहीही भाष्य केलेले नाही.मात्र आता वीरेंद्र सेहवागनंतर गंभीरने धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे.

याविषयी बोलताना गंभीर म्हणाला कि, धोनीच्या निवृत्तीविषयी इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार व्हायला हवा. धोनी सध्या ३८ वर्षांचा असून अनेक खेळाडूंचे त्याने निवृत्त व्हावे. असे अनेक खेळाडूंना वाटत आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत भारत सेमीफायनलमध्ये गेला. मात्र धोनीच्या संथ फलंदाजीमुळे भारताला पराभव स्वीकारावा लागल्याने त्याच्यावर अनेक जणांनी टीका केली होती. वर्ल्डकपमध्ये धोनीने ९ सामन्यांत फक्त २७३ धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट फक्त ८७. ७८ होता. धोनीच्या निवृत्तीविषयी अधिक बोलताना म्हणाला कि, आता आपण भविष्याच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. स्वतः धोनी कर्णधार असताना त्याने भविष्याच्या दृष्टीने विचार केला होता.

२००८ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या सीबी सीरीजमध्ये धोनीने म्हटले होते कि, मी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग यामध्ये खेळू शकत नाहीत. कारण येथील मैदान मोठे आहेत. त्याचा विचार होता कि, पुढील वर्ल्डकपसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान दिले पाहिजे. त्यामुळे त्याने यावेळी देखील तसाच निर्णय घ्यावा.

या पद्धतीने तयार करावेत यष्टीरक्षक फलंदाज

गंभीरने म्हटलं कि, २०२३ मधील वर्ल्डकप साठी नवीन यष्टीरक्षक फलंदाज तयार करणे गरजेचे आहे. भारताने आता युवा खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे. ऋषभ पंत, संजू सॅमसन किंवा ईशान किशन सारख्या खेळाडूंना भारतीय संघात संधी देऊन तयार करायला हवे. सर्वांनाच कमीत कमी दीड वर्ष संधी देणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांनी चांगले केले नाही तर दुसऱ्यांना संधी द्यावी.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like