…म्हणून गौतम गंभीरने केले महिलेवर अंत्यसंस्कार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारताचा माजी सलामीवीर क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी देशात कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईदरम्यान मानवतेचे उदाहरण सगळ्यांसमोर मांडले आहे. गंभीरने एका महिलेवर अंत्यसंस्कार करीत माणुसकी जपली आहे. संबंधित महिला गंभीरच्या घरी मागील 6 वर्षांपासून काम करत होती.

ओडिशात राहणारी सरस्वती पात्रा शुगर व रक्तदाबशी झुंजत होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 21 एप्रिल रोजी उपचार घेत असताना सरस्वती यांनी अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूच्या वेळी गंभीरने ट्विट केले की, ’ती माझ्या कुटुंबाचा भाग आहे. त्यांचे शेवटचे अंत्यसंस्कार करणे माझे कर्तव्य होते. जात, धर्म किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा विचार न करता नेहमीच प्रत्येकाचा सन्मान ठेवा. माझ्यासाठी एक चांगला समाज तयार करण्याचा हा मार्ग आहे.

मला वाटते हा भारत आहे. ओम शांती.’ असे ट्वीट गंभीरने केले आहे. दुसरीकडे त्याने कोरोना योद्ध्यांना नमन करीत 30 दिवसात आम्ही दररोज सुमारे 10 हजार लोकांमध्ये रेशन किट आणि भोजन वाटप केले आहे. सुमारे 15 हजार मास्क, 4 हजार 200 पीपीई किट आणि शेल्टर होममध्ये 2 हजार खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगितले आहे.