रोहित शर्मा आणि धोनीमुळे कोहली झाला ‘विराट’ कर्णधार, गौतम गंभीरचं मोठं विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर मोठे भाष्य केले आहे. कोहलीच्या यशस्वी कर्णधारपदाच्या कारकिर्दीबाबत भाष्य करताना याचे श्रेय माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा याला दिले. त्याने कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बोलताना म्हटले कि, धोनी आणि रोहित शर्मा याच्यामुळे विराट कोहली इतक्या यशस्वीरीत्या कर्णधारपद सांभाळत आहे.

एका खासगी मुलाखतीत बोलताना गंभीर म्हणाला कि, कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपमध्ये अतिशय शानदार कर्णधारपद भूषविले. त्याच्याबरोबर धोनी आणि रोहितसारखे खेळाडू असल्यामुळे त्याला इथल्या उत्तमरीत्या कर्णधारपद सांभाळता येत आहे. कोहली क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात उत्तम फलंदाज असून सर्वात यशस्वी कर्णधार देखील आहे. मात्र आयपीएलमध्ये त्याला अजूनही म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार म्हणून त्याला अद्याप यश मिळालेले नाही. गंभीरने पुढे बोलताना म्हटले कि, धोनीने चेन्नई सुपर किंग्सबरोबर जे मिळवले किंवा रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्सला ज्याप्रकारे चार विजेतेपदे मिळवून दिली. त्याप्रमाणे आरसीबीचा विचार केला तर आकडे आपल्या सर्वांसमोर आहेत.

दरम्यान, रोहित शर्मा हा सीमित षटकांच्या क्रिकेटमधील अतिशय उत्तम आणि शानदार खेळाडू आहे. याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिलेली संधी त्याच्यासाठी करो किंवा मरो अशी राहणार आहे. त्याने या संधीचे सोने केले नाही तर भारतीय संघाला दुसऱ्या खेळाडूचा पुन्हा विचार करावा लागेल. त्यामुळे मी घरच्या सामन्यांमध्ये मी त्याला सलामीवीर म्हणून बघत आहे. त्याचबरोबर त्याची संघात निवड केली असेल तर त्याला राखीव म्हणून न ठेवता 11 खेळाडूंमध्ये संधी द्यायला हवी, असेदेखील गंभीर याने म्हटले.

Visit – policenama.com