Gautami Patil | गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडिओवर महिला आयोगाकडून दखल; गौतमी पाटील म्हणाली “मला महिला आयोगाबाबत काहीच माहित नव्हते”

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. एका कार्यक्रमा दरम्यान गौतमी पाटील कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्यात आल्याने सध्या सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारावर सर्व स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात आले होता. आता राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील याची दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ही माहिती जेव्हा गौतमीला (Gautami Patil) कळाली तेव्हा तिने रूपाली चाकणकर यांचे आभार मानले आहे.

गौतमी (Gautami Patil) सध्या नाशिक मध्ये कार्यक्रमात व्यस्त आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, ” या संपूर्ण घटनेची महिला आयोगाने दखल घेतली हे ऐकून खूप बरं वाटलं. मला महिला आयोगाबाबत काहीच माहित नव्हते. मी माझ्या वेगळ्याच दुनियेत होते. जेव्हा मला कळाले की रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाई करा आणि दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई करा असे आदेश दिले आहेत. हे ऐकून खूप छान वाटले. मला प्रेक्षकांचे प्रेम वेळोवेळी मिळत आहे आणि आता देखील अजून जास्त प्रेम मिळत आहे. लोक माझ्यासोबत आहेत या गोष्टीचा मला अभिमान आहे. सध्या माझी बोलण्याची मनस्थिती नाहीये तरीही मी तुमच्यासमोर आली आहे. आपल्या लोकांची साथ मिळत आहे त्यामुळे त्यांचे आभार मानणे गरजेचे आहे”.

यादरम्यान तिला तिच्या वायरल होत असलेल्या व्हिडिओवर विचारले असता गौतमी म्हणाली,
“सध्या त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे. मी त्यावर काहीही बोलू इच्छित नाही.
माझी पोलिसांकडे काहीच मागणी नाही. माझं पोलिसांशी जे बोलणं चालू आहे ते चालू आहे.
मी त्याबाबत सध्या तरी काहीच बोलू शकत नाही. ”

Web Title :- Gautami Patil | dancer gautami patil comment on viral video of cloth changing state women commission

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Latur Crime News | माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

HSC Paper Leak Case | बारावी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

NCP MP Supriya Sule | आधी खाल्ल मटण, मग घेतलं महादेवाचं दर्शन, शिवसेना नेत्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेचं स्पष्टीकरण