Gautami Patil | गौतमी पाटीलवरुन पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवसेनेच्या माजी खासदारामध्ये जुंपली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या गौतमी पाटील (Gautami Patil) हिला पाटील आडनाव काढून टाकावे, अशी मागणी होत असतानाच आता गौतमी पाटीलवरुन (Gautami Patil) पुण्याच्या राजकारणातले दोन पाटील एकमेकांत भिडले आहेत. नुकतेच खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (NCP MLA Dilip Mohite Patil) यांनी गौतमीची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत केली होती. यावर आता शिवसेनेचे शिरुरचे माजी खासदार (Shivsena Former MP) शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) यांनी पलटवार केला आहे.

 

काय म्हणाले दिलीप मोहिते पाटील?

चित्रपटसृष्टीतील अनेकांनी आपले नाव बदलले आहे. गौतमी पाटील (Gautami Patil) तरुण कलाकार असून तिचं करिअर संपवू नका. या महाराष्ट्रात कोणीही पाटील होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भेद करु नये. गौतमी पाटील गरीब घरातून पुढे आली आहे. तिच्या कलेच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहचली. तिच्या कार्यक्रमावर देखील बंदी घालतात. तिच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होतो, असं असलं तरीही एक गोष्ट नक्की आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालासुद्धा एवढी गर्दी नसते, असा खोचक टोला दिलीप मोहीते पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

 

ते वेड्यांच्या नंदनवनात जगात-आढळराव पाटील

दिलीप मोहिते पाटील यांच्या टीकेवर बोलताना शिवसेनेचे शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, दिलीप मोहिते पाटील हे वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार आहेत. त्यात ते अज्ञानी आमदार आहेत, असं मी समजतो. ते वेड्यांच्या नंदवनामध्ये जगत असतात. कोणतंही कारण नसताना तोंड सुख घेणं, आरोप करणं ही त्यांची जुनी सवय आहे. गौतमी पाटीलची तुलना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करणं हे चुकीचं आहे.

 

आम्ही शरद पवारांना मानतो त्यामुळे

मुख्यमंत्र्यांबाबतच अशी वक्तव्य करणं, हे महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही. त्यामुळे त्यांना शोभेल अशी वक्तव्य करण्याचा सल्ला त्यांनी मोहिते पाटील यांना दिला. आम्ही देखील येत्या काळात गौतमीच्या कार्यक्रमाची तुलना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यासोबत करु शकतो. मात्र आम्ही शरद पवारांना मानतो त्यामुळे आम्ही कधीही अशी वक्तव्य करणार नसल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. दरम्यान, गौतमीने या दोन्ही नेत्यांच्या वादात न पडण्याचं पसंत केलं आहे. मला महाराष्ट्रातून प्रेम मिळत असल्याचं गौतमी म्हणाली.

 

गौतमीच्या कार्यक्रमात पावसाचा राडा

पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात केला राडा… या गाण्यावर राज्यातील गावोगावी राडा घालणाऱ्या गौतमी पाटीलच्या
कार्यक्रमात गोंधळ किंवा वाद झाल्याचे पाहिले असेल. मात्र, यावेळी प्रेक्षकांनी नाही तर पावसाने गौतमीच्या कार्यक्रमात राडा घातला.
राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी गौतमी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी चाकण मधील
मोई येथे गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र पावसाने या कार्यक्रमात राडा केल्याने कार्यक्रम रद्द करावा लागला.

 

 

Web Title :  Gautami Patil | gautami patil sirname controversy dilip mohite patil
and adhalrao patil reaction on gautami patil dance show

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा