Gautami Patil | गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम : नृत्यांगणा गौतमी पाटीलने (Gautami Patil) तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ हा होतच असतो. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान गौतमी (Gautami Patil) कपडे बदलत असतानाचा एक व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

24 फेब्रुवारीला कार्यक्रमादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने गौतमी पाटीलचा अर्धनग्न व्हिडिओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि गौतमी पाटीलच्या अन्य सहकाऱ्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याची तक्रार गौतमी पाटील सोबत डान्स करणाऱ्या एका मुलीने पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात केली आहे. या अंतर्गत विमानतळ पोलिस ठाण्यात मुलीच्या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. गौतमी पाटीलचा (Gautami Patil) व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे येथे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पुण्यात काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान ती कपडे बदलत असताना एका अज्ञात व्यक्तीने व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल केला. गौतमीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालल्याने तिला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केल्याची चर्चा सध्या होत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय बनत आहे. अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

या प्रकरणावर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी देखील टीका केली आहे.
गौतमी पाटील एक स्त्री आहे, तिचा अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे आहे
महिला कलावंताचा अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करणे खूपच निंदनीय असल्याचे मत मंगल यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात जिजाऊ, रमाबाई सावित्रीबाई सारख्या स्त्रीची हेटाळणी का केली जाते?
असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील दखल घेतली आहे.
या व्हिडिओवर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

Web Title :- Gautami Patil | gautami patil viral video case fir registered pune police investigation underway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | लाच घेताना मनमाड नगरपरिषदेतील तीन कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ayan Mukerji | ‘ब्रह्मास्त्र 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ; दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली मोठी हिंट

Deepika Padukone | ‘ऑस्कर 2023’मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार ‘या’ भूमिकेत; पोस्ट शेअर करत दिली माहिती