Gautami Patil News | गौतमी पाटीलच्या ‘पाटील’ आडनावावरून नव्या वादाला फुटले तोंड; खरे आडनाव पाटील नसल्याचा दावा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Gautami Patil News | ‘सबसे कातील गौतमी पाटील’, असा आवाज देत संपूर्ण महाराष्ट्राला तिच्या नृत्याने व अदांनी वेड लावले आहे. जागोजागी प्रत्येक कार्यक्रम हीट करणारी गौतमी आता तिच्या डान्सवरून नाही तर नावावरून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होत असल्यामुळे तिने पाटील (Patil) आडनाव लावू नये अशी मागणी एका मराठा संघटनेकडून (Maratha Sanghatana) करण्यात आली आहे, तर ‘मी पाटीलच आहे आणि हेच नाव मी वापरणार’, असे चोख प्रत्युत्तर गौतमी पाटीलने दिले आहे.

गौतमी पाटील आणि वाद हे जणू एक समीकरण बनले आहे. तिच्या कार्यक्रमात झालेल्या राड्यावरून किंवा तिच्यावर करण्यात आलेल्या टीकेमुळे ती कायम चर्चेत असते. आता मात्र वाद हा डान्स (Dance) किंवा राड्याचा नसून तिच्या नावाचा आहे. गौतमीच्या पाटील आडनावालाच मराठा संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. पुण्यात (Pune) गौतमीच्या आडनावाच्या वादावरून नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार (Cabukswar) आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात (Maharashtra) तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही’, असा धमकीवजा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील (Rajendra Jarhad Patil) यांनी दिला आहे.

यावर नृत्यंगणा गौतमीने चांगले प्रतिउत्तर दिले असून ‘मी पाटीलच आहे आणि हेच नाव मी वापरणार’, माझ्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी, मला काही फरत पडत नाही.’ ‘मी जे कार्यक्रम करते ते, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.’ माझे हे कार्यक्रम चांगले पार पडत आले आहेत, असे गौतमीने म्हटले आहे.

या नव्या वादावर रंगकर्मी शंभू पाटील (Shambhu Patil) यांनी गौतमीची बाजू सावरत पाटील नाव लावू नये,
असे म्हणणे मुळात वेडेपणाचे आहे असे म्हटले आहे. पाटील ही एक उपाधी असून पाटील, देशपांडे, कुलकर्णी, देसाई
ही गाव सांभाळणारी माणसे होती. पाटील हे आडनाव कुठल्याही जातीची मक्तेदारी नाही.
गौतमी पाटील (Gautami Patil News) यांनी साधन सुचिता जपली पाहिजे, यात कुणाचे दुमत नाही.
गौतमी पाटील यांच्या बाबतीत जर तुम्हाला साधन सुचिता जर सांगायची असेल तर तिच्या कार्यक्रमाला
मराठा समाजातील (Maratha Community) मुलांनी जाऊ नये, कार्यक्रम घेणाऱ्यांनी आयोजन (Organized)
करू नये. कुठल्याही नावावरून गौतमी पाटीलला वेठीस धरणे हे चुकीचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या काळापासून महिलांना सुरक्षा पुरवणे ही
मराठा समाजाची जबाबदारी आहे, असे कुठलेही फालतू वाद निर्माण करून समाजाला बदनाम करु नका असे
आवाहन रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले आहे.

Web Title :  Gautami Patil News | Gautami Patil’s surname ‘Patil’ sparked a new controversy; The claim that the real surname is not Patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

National Service Scheme (NSS) Pune | सामाजिक जाणीव निर्मितीचा उपक्रम अधिक सशक्त करण्याची गरज – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Pune Traffic Police | नो पार्किंगला गाडी लावताय तर सावधान; वाहतूक पोलिसांकडून बसेल मोठा भुर्दंड

IAS Dr Rajesh Deshmukh | शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख