Gautami Patil | गौतमी पाटील लवकरच झळकणार ‘या’ चित्रपटात; पोस्ट शेअर करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन : आपल्या लावणीच्या तालावर गौतमी पाटील (Gautami Patil) हिने आजवर सगळ्यांना नाचवले आहे. मात्र मध्यंतरी सोशल मीडियावर गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. यावरून तिला अनेकांनी ट्रोल देखील केले होते. तर अनेक लावणी कलावंतांनी तिला खडे बोल देखील सुनावले होते. त्यानंतर गौतमीने पत्रकार परिषद घेत सगळ्या गोष्टी मान्य करत माफी देखील मागितली होती. आता गौतमी पाटील (Gautami Patil) ही लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे.

गौतमी पाटीलने आजवर तिच्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावले आहे. आता ती तिच्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा एकदा प्रेक्षकांवर भुरळ पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. गौतमी आता लवकर चित्रपटात दिसणार आहे. याची माहिती तिने स्वतः चाहत्यांना दिली आहे. गौतमीच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘घुंगरू’ असे असल्याचे तिने सांगितले आहे.

पोस्ट शेअर करत गौतमीने (Gautami Patil) याबद्दलची माहिती दिली होती. यावेळी ती म्हटली की, “लवकरच मी तुमच्यासमोर एका नवीन भूमिकेत येणार आहे. लवकरच माझा ‘घुंगरू’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मी नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार हे आत्ताच सांगणार नाही. तुम्ही स्वतः चित्रपटगृहात येऊन चित्रपट पहावा अशी माझी इच्छा आहे. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल. सध्या या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे. शूटिंग नंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. मात्र तरीही सर्वांनी हा चित्रपट नक्की पहावा असे आवाहन यावेळी गौतमीने केले आहे.

Web Title :- Gautami Patil | renowned lavani performer gautami patil soon appear in the marathi movie name reveled

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PSI Death Due To Heart Attack | दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Deepak Kesarkar | संजय राऊत यांच्या चौकशीच्या मागणीला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Honey Singh | आता गायक हनी सिंगने पठाण चित्रपटातील गाण्याबद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Sanjay Raut | शिंदे सरकारला एसआयटी स्थापन करण्याची फार खाज, रेशन वाटावे तसे एसआयटी वाटत सुटलेत – संजय राऊत