पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात अखेर पुणे पोलिसांना यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आले असून, त्यांना जयपूर येथे गुन्हे शाखेने सुखरूप ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंग झाल्याची नोंद करण्यात आली होती, तर त्यांच्या मुलांनी काही जणांवर संशय व्यक्त करत पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरू आहे.

दरम्यान, बेपत्ता झाल्यानंतर पाषाणकर हे पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग भागात एका नारळ पाणी विक्रेत्याकडे दिसून आले होते. पण त्यानंतर ते कोठेच सीसीटीव्हीत दिसून आले नव्हते. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू हाेता. यादरम्यान कोल्हापूर शहरात दिसून आल्याचे समोर आले हाेते. येथील एका हॉटेलमध्ये ते राहिले आहेत. हे सीसीटीव्ही पोलिसांना मिळाले. त्यांनी पाषाणकर यांच्या कुटुंबाला ते दाखविले. त्यावेळी त्यांनीदेखील त्यावेळी ओळखले आहे. त्यानुसार कोल्हापूर येथे गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. तसेच त्यांचा शोध सुरू केला.

दरम्यान, पाषाणकर हे कोकणात गेले असावेत, अशी शक्यता गृहीत धरून गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत. त्यानुसार त्यांचा या भागात शोध घेतला जात आहे. दरम्यान, आज पाषाणकर जयपूर येथे मिळून आले आहेत. आता त्यांच्या बेपत्ता होण्यामागची अनेक कारणे आद्यप स्पष्ट झालेली नाहीत. त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. पाषाणकर २१ ऑक्टोबर रोजी शहरातून बेपत्ता झाले होते.