समलिंगी जोडप्याला दिला झेंडा वंदनाचा मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे देशभर ७० वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाने सर्वच पुणेकरांचे लक्ष वेधले गेले. गोष्ट आहे पुण्यातील एस एम जोशी फाऊंडेशनच्या मैदानात आयोजित केलेल्या लोकशाही उत्सवाची या उत्सव दरम्यान यंदा एका समलिंगी जोडप्याला झेंडा वंदन करण्याचा मान देण्यात आला आहे. या समलिंगी जोडप्याचे नाव समीर समुद्र आणि अमित गोखले असे असून हे जोडपे यंदाच्या झेंडा वंदनाचे मानकरी ठरले आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला स्थान मिळते हे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला दिलेल्या सन्मानाने लक्षात आले. या सन्मानाने आम्हाला आनंद वाटला. त्याचबरोबर या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव झाला असल्याची भावना यावेळी समीर समुद्र आणि अमित गोखले यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

Pune : तुळशीबागेतील दुकानांना भीषण आग