समलिंगी कायद्याला मान्यता मात्र अपमान जैसे थे; ‘गे’ कर्मचाऱ्याचा बॉसकडून छळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

नुकतच न्यायालयाकडून समलैंगी संबंधाना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर समलिंगी समूहाने आंनदोत्सव साजरा केला. आता तरी त्यांची घुसमट थांबेल त्यांचा वारंवार होणारा अपमान थांबेल अशी आशा होती. मात्र मुंबई येथील नामांकित आय टी कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या ‘गे’ कर्मचाऱ्याला त्रासदायक वागणूक दिल्याचा आरोप केल्याची माहिती मिळते आहे.

गौरव प्रामाणिक असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याची बॉस रिचा गौतम हिच्यावर हे आरोप केले गेले आहेत. रिचा सध्या टेक महिंद्रा कंपनीमध्ये डायव्हर्सिटी विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहते. गौरवच्या आरोपांनंतर अजून एका माजी कर्मचाऱ्याने रिचा ही मुस्लीम धर्माविरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही केला आहे.

२०१२ पासून ते २०१६ पर्यंत गौरव महिंद्रामध्ये काम करत होता. त्यावेळी रिचा त्याच्या ‘गे’ असण्यावरून आणि त्याच्या रंगीबेरंगी कपड्यांवरून जाहीरपणे टिंगलटवाळी करून गौरवला लज्जास्पद वागणूक देत असे. ती त्याचा उल्लेख ‘बायक्या’ असा करत होती. ती तिच्या हाताखालच्या अनेकांना ती गौरवची टिंगल करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप गौरवने केला आहे. ट्विटरवर केलेल्या पत्राच्या माध्यमातून हे आरोप करण्यात आले आहेत.

आणि…. जिमला जाण्याचा ‘तो’ दिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस 

या सगळ्याला वागणुकीला कंटाळून गौरवने २०१६ मध्ये महिंद्रा कंपनीचा राजीनामा देत नोकरी सोडली. गौरवच्या या तक्रारीनंतर स्पंदन महंता या अजून एका कर्मचाऱ्याने रिचावर मुस्लीमांविरोधी वर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या प्रकरणाची दखल घेत आता एका त्रयस्थ अधिकाऱ्याद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. कारण डायव्हर्सिटी विभागासोबत रिचा महिंद्रा कंपनीच्या अन्य समितीमंडळांवरही असल्याने ही चौकशी निष्पक्षपातीपणे होण्यासाठी त्रयस्थ अधिकारी नेमण्यात येणार आहेत.

[amazon_link asins=’B07CRGDR8L,B0751LSRGF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b133adbf-b8dc-11e8-8a67-7b6cedc76e6f’]