‘मला नपुंसक बनवलं’ – रशियन व्यक्‍तीकडून Apple वर गंभीर आरोप, ठोकला 11 लाखाचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रुसच्या एका व्यक्तीने अ‍ॅपल या नामांकित कंपनीवर आरोप केले आहेत की, आयफोनच्या एका अ‍ॅपमुळे तो समलैगिक झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार तरुणाने मॉस्कोच्या एका न्यायालयात या संबंधी दाद मागीतली आहे आणि अकरा लाख रुपयांचा मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे.

बिटकॉइन ऐवजी मिळाले गेक्वॉइन
तरुणाने आरोप केला आहे की त्याने अ‍ॅपलच्या फोन वरून एका अ‍ॅपद्वारे बिकॉइन मागवले होते मात्र त्या जागी त्याला गेक्वॉइन पाठवण्यात आले. तरुणाच्या वकिलांनी सांगितले की हे प्रकरण खूपच गंभीर आहे आणि तरुण खूप घाबरलेला आहे.

तरुणाने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की गेकॉइन वर लिहिले होते की ट्राय करण्याआधी काही तर्क लावू नका. त्यानंतर तरुणाने लिहिले की एखाद्याला ट्राय न करता त्याविषयी काही जज कसे काय करू शकतो ? त्यानंतर त्याने समलैगिक संबंध ट्राय केले. त्यानंतर तरुण म्हणतो आता माझ्याकडे एक बॉयफ्रेंड आहे मात्र  मला प्रश्न पडलाय की आता मी पालकांना कसे सांगू. अ‍ॅपलमुळे माझे आयुष्य पार बदलून गेले आता मी नॉर्मल नाही होऊ शकत आणि यामुळे माझे  मानसिक नुकसान झाले आहे असे मत तरुणाने आपल्या तक्रारीत व्यक्त केले आहे.

तरुणाच्या वकिलांनी सांगितले की कंपनीवर असेलेल्या सर्व प्रोग्रॅमला कंपनी जबाबदार असते मग तो प्रोग्रॅम अन्य कोणत्याही कंपनीचा का असेना. 20  सप्टेंबर रोजी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.17 ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार आहे.