काय सांगता ! होय, ‘या’ प्रॉपर्टी डीलरचा दावा, प्रियसीसाठी चक्क चंद्रावर खरेदी केली जमीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भगवान बुद्धांचे ज्ञानस्थान असलेल्या बोधगया येथील तरुण मालमत्ता विक्रेता नीरज गिरी याने चंद्रावर एक एकर जमीन विकत घेतल्याचा दावा केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याने आपल्या प्रियसीसाठी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. त्याने त्याची नोंदणी देखील केली आहे आणि आता तो त्या जमिनीला पाहण्यासाठी चंद्रांवर जाण्याचे स्वप्नसुद्धा पाहत आहे.

नीरजला जमीन खरेदी-विक्रीचा शौक आहे

नीरजच्या चंद्रावर जमीन खरेदी केल्याच्या चर्चेमुळे या भागात गोंधळ सुरु झाला आहे. बोधगया या छोट्याशा गावात बाथसपूर येथे राहणारा तरुण मालमत्ता विक्रेता नीरज गिरी हा तरुणपणापासूनच जमीन खरेदी-विक्रीचा शौकीन आहे आणि आता आपला छंद पूर्ण करण्यासाठी तो चंद्रावर एक एकर असल्याचे सांगत आहे. जमीन नोंदविली गेली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना नीरज गिरी आपल्या प्रयसीसाठी चंद्र तोडल्याची कहाणी आठवूण म्हणला की, आपल्या प्रियसी किंवा भावी पत्नीसाठी चंद्र तोडून आणू शकत नाही परंतु हा विश्वास देऊ शकतो की, ज्या चंद्राला पाहून प्रियकर-प्रियसीला सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेत असतात. त्याच चंद्रावर त्याची मालमत्ता आहे.

सुमारे एक वर्षानंतर नीरजला जुलैच्या पहिल्या आठवड्यात चंद्रावर एक एकर जागेची नोंदणी करण्याचे काम मिळाले. हे काम मिळाल्यानंतर नीरज खूप उत्साही आहे. शाहरुख खान आणि नुकतेच मृत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या नावे चंद्रावर जमीन नोंदणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या एका चाहत्याने शाहरुख खानला ही जमीन गिफ्ट केली होती.

आंतरराष्ट्रीय चंद्र लँड रेजिस्ट्रीमधून जमीन खरेदी केली

नीरज म्हणतो की, चंद्रावरील जमिनीची विक्री प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय चंद्र लँड्स रेजिस्ट्री नावाच्या वेबसाइटच्या माध्यमातून केली जाते. चंद्रावर जमीन नोंदवणारे बोधगयाचे नीरज गिरी म्हणाले की, जमीन किंमत कमी आहे पण त्याची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची आहे. त्यांनी 2019 मध्ये जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू केली आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात रजिस्ट्रीची डीड घेतली.

चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा अर्थ काय आहे?

वास्तविक, जो व्यक्ती चंद्रावर जमीन विकत घेतो तो चंद्रावर जाऊ शकत नाही किंवा तिथेच राहू शकत नाही, परंतु आपल्या मनाचे मनोरंजन करण्यासाठी तो हे खरेदी करतो. हेच कारण आहे की, भारतात चंद्रावर जमीन खरेदी करणारे मोजकेच लोक आहेत. भारतात हे काम बेकायदेशीरही मानले जाते कारण भारताने 1967 मध्ये 104 देशांशी करार केला आहे, ज्यामध्ये चंद्र, तारे आणि जागा ही कोणत्याही एका देशाची मालमत्ता नाही आणि त्यावर कोणीही दावा करु शकत नाही. .