‘ही’ आहेत देशातील टॉपची 10 ‘स्वच्छ’ अन् ‘घाणेरडी’ शहरे, सर्व्हे रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षी स्वच्छ शहरांच्या 2020 च्या सर्वेमध्ये 1 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये अंबिकापूरने बाजी मारली आहे. आणि सर्वात अस्वच्छ शहरांमध्ये बिहारमधील गया शहर आहे, जो या यादीत 382 व्या स्थानावर आहे.

स्वच्छता शहरांच्या या 2020 च्या सर्वेमध्ये गयाचा स्कोअर 737.74 इतका असून सर्वात स्वच्छ ठरलेल्या अंबिकापूरचा स्कोअर 5428.31 इतका आहे. ही रँकिंग 10 लाखाच्या आत लोकसंख्या असणाऱ्या शहरांची आहे, ज्यांची देशातील संख्या 382 आहे.

10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या टॉप स्वच्छ 10 शहरांमध्ये अंबिकापूर, म्हैसूर, नवी दिल्ली, चंद्रपूर, खरगोन, तिरुपती, जमशेदपूर, गांधीनगर, धुळे, राजनांदगाव या शहरांचा समावेश आहे.

10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या टॉप अस्वच्छ 10 शहरांमध्ये गया, बक्सर, अबोहर, बागलपुर, परसा बाजार, शिलॉंग, इटनागर, दिमापूर, बिहार शरीफ आणि सहरसा या शहरांचा समावेश आहे.

केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने गुरुवारी स्वच्छता सिटी रिपोर्ट जाहीर केला. 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये सलग चौथ्यांदा इंदौर देशात सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. दुसऱ्या स्थानी गुजरात मधील सुरत तर तिसऱ्या स्थानी नवी मुंबई आहे.

10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये बिहारची राजधानी असलेलं पटना हे शहर सर्वात अस्वच्छ शहर ठरलं आहे.