धक्कादायक ! ‘१०० दिवस सेक्स न करता कशी राहशील, बॉसचं ?’ ; ‘या’ अभिनेत्रीला ‘शो’मध्ये एन्ट्रीसाठी विचारला प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टेलिव्हिजनवरील विवादीत शो बिग बॉस तेलगु सीजन 3 गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडलेला दिसत आहे. दिवसेंदिवस या शोच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच हैद्राबादमधील एका महिला पत्रकाराने या शोच्या आयोजकांविरोधात तक्रार केली होती की, तिच्याकडे सेक्सची मागणी करण्यात आली आहे.

यात 4 जणांचा समावेश आहे. तिने या 4 आयोजकांविरोधात रितसर तक्रारही दाखल केली आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीला वाईट अनुभव आला आहे. शोच्या समन्वयकाने तिला अश्लील प्रश्न विचारला आहे. सेक्स न करता 100 दिवस कशी राहशील असे तिला विचारल्याचे तिचे म्हणणे आहे. गायत्री गुप्ता असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

गायत्री गुप्ता म्हणाली की, “कार्यक्रमाच्या समन्वयकाने मला 100 दिवस सेक्स न करता कशी राहशील असा अश्लील प्रश्न विचारला. याशिवाय बॉसला खुश करण्यासाठी तू आणखी काय करू शकतेस असेही मला विचारण्यात आले.” यानंतर या प्रकरणी गायत्रीने पोलिसांत धाव घेतली आहे.

अभिनेत्री गायत्री गुप्ताने हैद्राबादमधील बंजारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बिग बॉसमधील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे बिग बॉस तेलगूच्या तिसऱ्या सीजनच्या टेलिकास्ट होण्याआधी हा शो अधिकच अडचणीत सापडला आहे. रिपोर्ट्सनुसार, हा शो 21 जुलै रोजी सुरु होणार होता. असे समजत आहे की, बिग बॉस सीजन 3 हा शो साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन होस्ट करणार आहे.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान