Gayatri Datar | गायत्री दातारचं टेलिव्हिजनवर कमबॅक; ‘या’ मालिकेतुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) नंतर पुन्हा एकदा मालिका विश्वास पदार्पण करण्यासाठी अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) आता सज्ज आहे. ‘तुला पाहते रे ‘(Tula Pahate Re) या मालिकेतून सगळ्यांच्या मनामनात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार म्हणजेच इशा पुन्हा एकदा चाहतांच्या भेटीसाठी येणार आहे. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर गायत्री पुन्हा एकदा मालिकाविश्वात (Serial) कमबॅक (Comeback) करणार आहे. गायत्री दातार (Gayatri Datar) आता एका सुप्रसिद्ध अशा मालिकेत दिसणार आहे.

 

गायत्री दातरची धमाकेदार एंट्री ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhnaje Nakki Kay Asta) या मालिकेत होणार आहे. या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. घरच्यांसाठी बाळ आणि जयदीप हे कायमचे गेले आहेत. तर दुसरीकडे जयदीप ने नव्या आयुष्याची सुरुवात एका नव्या शहरांमध्ये केली आहे. सिरीयलने सहा वर्षांचा लीप घेतला आहे. सहा वर्षानंतर दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांमध्ये गायत्री दातार (Gayatri Datar) हिची एन्ट्री होणार आहे.

 

रुही कारखानीस असे या पात्राचे नाव असून गायत्री दातार ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
सध्या स्टार प्रवाहच्या या मालिकेबद्दल गायत्रीला विचारले असता ती म्हणाली,
“ही भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. त्यातच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी म्हणजेच
अभिनेत्री गिरिजा प्रभू (Girija Prabhu) सोबत मी एका रियालिटी शोमध्ये काम केल्यामुळे आमची जुनी मैत्री आहे.
त्यामुळे मला या टीम सोबत काम करताना खूप आनंद होत आहे.”
सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका टीआरपी (TRP) पाच वरून तीन वर आली आहे.
या आठवड्यात मालिका 6.5TVT रेटिंग सह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

Web Title :- Gayatri Datar | sukh mhnaje nakki kay asta tula pahate re fame actress gayatri datar will make entry in serial

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | लक्ष्मी पूजनादिवशी बुधवार पेठेत वाहनांची तोडफोड करणारे टोळके जेरबंद

Sambhaji Raje Chhatrapati | स्वराज्य पक्षांच्या 105 पेक्षा जास्त शाखांचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’