‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचं ‘या’ नाटकातून रंगभूमीवर ‘एन्ट्री’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुला पाहते रे ही टीव्ही सीरीयल प्रेक्षकांमध्ये खूपच गाजली. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर या जोडीने तर प्रेक्षकांना वेडच लावलं. यातील इशा मात्र सर्वांनाच खूप आवडली. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी इशाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता गायत्रीला लवकरच रंगभूमीवर पाहू शकता. लवकरच गायत्री एका नाटकातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. राहुल भंडारे निर्मित निम्मा शिम्मा राक्षस असं या नाटकाचं नाव आहे.

image.png

हे नाटक एक बालनाट्य

निम्मा शिम्मा राक्षस या नाटकातून गायत्री रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. अद्वैत थिएटर्सचं हे नाटक बालनाट्य आहे. राहुल भंडारे निर्मित या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर करत आहेत. रत्नाकर मतकरी हे या नाटकाचे लेखक आहेत. विशेष बाब अशी की, या नाटकाच्या निमित्ताने राहुल भंडारे, नाटककार रत्नाकर मतकरी आणि चन्मय मांडेलकर हे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

या नाटकातून गायत्रीचं रंगभूमीवर पदार्पण

या नाटाकबद्दल आणखी सांगायचे झाले तर, या नाटकात गायत्रीसोबत अंकुर वाढवे आणि मयुरेश पेम हे देखील दिसणार आहेत. याशिवाय इंटरकॉलेज एकांकिका स्पर्धेत गाजलेले चेहरेही या नाटकात दिसणार आहेत. निम्मा शिम्मा राक्षस नाटकात गायत्री दातार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या नाटकात तुम्हाला गाण्यांचाही अनुभव मिळणार आहे. या नाटकातील 3 तीन गाणी चिन्मय मांडलेकर यांनी लिहिली आहेत. मयुरेश माडगावकर यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत तर जसराज जोशीने ही गाणी स्वरबद्ध केली आहेत.

प्रेक्षकांना नाट्य अवकाशाचे थ्रीडी स्वरुप अनुभवता येणार

या नाटकाच्या विविध दृश्यांमध्ये प्रोजेक्शनच्या पातळीवर थ्रीडी मॅपिंग हे तंत्र वापरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नाट्य अवकाशाचे थ्रीडी स्वरुप अनुभवता येणार आहे. रंगमंचावरील अवकाश प्रेक्षकांना अधिकाधिक वास्तव भासणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –