‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारनं शेअर केले फोटो ! ‘असा’ लुक पाहून चाहते म्हणाले – ‘असले चाळे करू नकोस’

पोलिसनामा ऑनलाईन – तुला पाहते रे ही टीव्ही सीरीयल प्रेक्षकांमध्ये खूपच गाजली. मालिकेतील ईशा निमकर ही भूमिका गायत्री दातार (Gayatri Datar) हिनं साकारली होती. मालिकेतून ती घराघरात पोहोचली. गायत्री सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टीव्ह असते. आपल्या फोटोंमुळं ती अनेकदा अटेंशन घेताना दिसत असते. नुकतंच तिनं एक बोल्ड अँड ग्लॅमरस फोटोशुट केलं. परंतु यासाठी काहींनी तिला ट्रोल केलं आहे.

गायत्रीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. आपल्या लुकला तिनं बोल्डनेसचा तडकाही दिला आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं निळ्या रंगाची साडी नेसली आहे तर काळ्या रंगाची लिपस्टिकही लावली आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. काहींना तिचा हा ग्लॅमरस लुक आवडला आहे. तर काहींनी मात्र तिच्यावर टीका करत ट्रोल केलं आहे.

एकानं तिला सल्ला दिला आहे की, कोळसा खाऊ नये. तर एका युजरनं असंही लिहिलं की मिशा लावू नकोस ताई. काहींनी तर असंही म्हटलं आहे की, असले चाळे करू नकोस.

गायत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. काहींनी हे फोटो शेअर केल्याचंही दिसत आहे.

गायत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तुला पाहते रे ही तिची पहिली मालिका होती. मालिकेत तिनं साकारलेली ईशा सर्वांनाच आवडली.