Post_Banner_Top

‘होशवालों को खबर क्या…’ ; शहराच्या स्थापना दिनानिमित्त आज गझल मैफल

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – अहमदनगर शहराच्या ५२९ व्या स्थापना दिनानिमित्त रसिक ग्रुपच्यावतीने आज सायंकाळी सहा वाजता भिस्तबाग महाल येथे गझल गायक आल्हाद काशीकर यांच्या ‘होशवालों को खबर क्या…’ या गझल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी ही माहिती दिली.

ऐतिहासिक अहमदनगर शहराचा मंगळवारी (२८ मे) ५२९ वा स्थापना दिन साजरा होत आहे. या निमित्ताने नगर शहराचा ५२९ वर्षाचा साक्षीदार असलेल्या बेहस्त बाग महाल (भिस्तबाग महाल) या ऐतिहासिक वास्तूच्या सानिध्यात गझल मैफल रसिक ग्रुपने आयोजित केली आहे.

या कार्यक्रमास महापौर बाबासाहेब वाकळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, प्रदीप गांधी, डॉ.रवींद्र साताळकर, पेमराज बोथरा, आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गझल गायक आल्हाद काशीकर यांनी दिल्ली, मुंबई, पुणे, दुबई, अबुधाबी, यासह परदेशातील विविध ठिकाणी गझल गायनाचे यशस्वी कार्यक्रम सादर केले आहेत.

Loading...
You might also like