राजुरी येथे प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत गँस कनेक्शनचे वाटप

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी येथे उज्वला दिवसच्या निमित्ताने प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत विश्वास गॅस एजन्सी माळशिरसचे मालक विश्वास आंबोले यांच्या वतीने १७ मोफत एच पी गँस कनेक्शन वाटप करण्यात आले. यावेळी गॅस कसा वापरायचा याचे प्रात्यक्षिक महिलांना दाखविण्यात आले.पंतप्रधान उज्वल योजनेमुळे ग्रामीण भागातील स्त्रीयांचे आरोग्यमान चांगले राहते.आयुष्यमान वाढेल, प्रगती होईल, ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना खूप चांगली आहे मत विश्वास गॅस एजन्सीचे मालक विश्वास आंबोले यांनी व्यक्त केले.

यावेळी ओएनजीसीआय मुंबईचे वरिष्ठ अधिकारी श्रीवास्तव,पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ताशेठ झुरंगे, राजुरीच्या सरपंच नंदाताई भगत, उपसरपंच कृष्णाजी भगत, शिवसेनेचे गणेश मुळीक, गणेश धुमाळ, उद्धव भगत, शशि गायकवाड, आबा चव्हाण, मल्हारी चव्हाण, महादेव बोरकर, शरद गायकवाड,आनंदा दौंडकर, राजू माने, मुख्याध्यापक राणे, विजय शिवरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.