बॉम्ब बनविण्यासाठी जिलेटीन पुरवणाऱ्याला अटक

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – कळंबोली येथील सुधागड शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब ठेवणाऱ्या तिघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात या आरोपींना जिलेटीन पुरवणाऱ्या चौथ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

सुरेश बन्सी राठोड (३५) असे त्याचे नाव आहे. सुशील साठे, मनीष भगत, दीपक दांडेकर या तिघांनी बॉम्ब बनवून तो कळंबोली येथील सुधागड शाळेजवळ ठेवला होता. त्याचा स्फोट घडवून आणून त्याद्वारे बिल्डरांना धमकावून खंडणी वसुल करण्याचा त्यांनी कट रचला होता.

कळंबोली येथील बॉम्ब प्रकरणात या तिघांना बॉम्ब बनविण्यासाठी स्फोटके पुरविणाऱ्याचा पोलिसांनी शोध सुरु केला. त्यावेळी त्यांना सुरेशची माहिती मिळाली. सुरेश हा दगड खाणीत काम करत असल्याने तेथे वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांची त्याला माहिती होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर या तिघांनी सुरेशकडून जिलेटीन घेतल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार सुरेश राठोड याला अटक करण्यात आली आहे.

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा