Geliose Hope | 20 पैसे प्रति किमी खर्चात धावते ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर, 5 हजार रु. डाऊनपेमेंट करून घरी घेऊन या

नवी दिल्ली : Geliose Hope | 50 हजार रुपयांच्या आत एखादी इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आयआयटी दिल्लीचे स्टार्टअप Geliose ची Hope टू-व्हिलर खरेदी करू शकता. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर अवघ्या 20 पैसे प्रति किमी खर्चात धावते.

तुम्ही ही स्कूटर 5 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटनंतर घरी जाऊन शकता. या टू-व्हीलरची किंमत 46,999 रुपये (ऑन रोड प्राईस, दिल्ली) आहे. डाऊन पेमेंटनंतर 36 महिन्यासाठी एकुण 41,999 रुपयांचे लोन घ्यावे लागेल ज्यावर वार्षिक 9.7 टक्केचा व्याजदर लागू होईल.

36 महिन्यात एकुण 54,216 रुपये भरावे लागतील. ज्यामध्ये व्याज 12,217 रुपये असेल. महिन्याचा ईएमआय 1,506 रुपये असेल. 60 महिन्याच्या लोनसाठी 1,039 रुपये ईएमआय आहे.

 

Geliose च्या Hope ची वैशिष्ट्ये

– पोर्टेबल बॅटरी.

– इंटरनेटशी कनेक्टेड टू-व्हीलर.

– फुल बॅटरी चार्जमध्ये 75 किलो मीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज.

– बॅटरी 3 तासात फुल चार्ज होते.

– 48 V, 30 Ah बॅटरी, 250 W मोटर पॉवर मिळेल.

– स्कूटर 25 kmph च्या स्पीडने धावू शकते.

– डिजिटल स्पीडोमीटर आणि ट्रिपमीटर.

– यामध्ये BLDC (ब्रशलेस DC इलेक्ट्रिक मोटर) आहे.

– स्पीड 25 किलो मीटर प्रति तास असल्याने चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन आणि डायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही.

Web Title : Geliose Hope | electric scooter geliose hope price features and driving range

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update