लज्जास्पद… हुंड्यासाठी दिरानेच केला भावजईवर लैंगिक अत्याचार

कोलकाता : वृत्तसंस्था – हुंड्यासाठी सासरकडच्या मंडळींकडून मुलींचा छळ केल्याच्या अनेक घटना आपण माध्यमांतून ऐकल्या असतील अथवा वाचल्या असतील परंतु कोलकात्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे हुंड्याच्या हव्यासापायी नराधमांनी फक्त छळच केला नाही तर पतीसह दिराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित महिलेने सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अद्याप सुरु आहे.

दिराने पीडितेवर केला सतत अत्याचार…
कोलकाता येथील बेलिगुंगे पार्क परिसरात राहणाऱ्या विवाहितेचा हुंड्यासाठी लैंगिक छळ केला. याप्रकरणी पीडितेच्या पतिला आणि दिराला अटक करण्यात अली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती सुरंजनसेन याने बळजबरीने तिच्यासोबत संबंध ठेवले. तर दिराने सतत लैंगिक अत्याचार केले आहे.

पत्नीची करत होते अदलाबदली…
पीडित महिलेने याप्रकरणाबाबद सासू सासर्यांना सांगितले असता तिच्याकडे दुर्लक्ष करत ते तिला म्हणाले की भावांमध्ये पत्नीची देवाण-घेवाण करण्याची प्रथा आहे. तथापि, आरोपीच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यात घटस्फोटावरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. यामुळे महिला दोन्ही भावांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल तपासणी केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.