Advt.

का वाढतोय ‘लिंग’ बदलण्याचा ट्रेंड? जन्मानं ‘पुरुष’ मनानं मात्र ‘महिला’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या काही दिवसांमध्ये गुजरातमध्ये लिंग परिवर्तन करण्याचा जणू ट्रेंडच समोर आला आहे. असे अनेक लोक समोर आले आहेत ज्यांनी सर्जरी करत आपलं लिंग बदललं आहे. असं करूनही त्यांनी आपली नवीन ओळख ही नेहमीच्या गावी आणि त्याच परिसरात काय ठेवली आहे. ही चांगली बाब आहे लोक आता सहजतेनं बदलांना स्विकारत आहेत. काही लोक असेही आहेत ज्यांना आपलं लिंग बदलण्यात विशेष काही वाटत नाही.

एकाच वर्षात समोर आल्या शेकडो केसेस
एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, एका प्रसिद्ध प्लास्टिक सर्जननं सागितलं आहे की, 2020-21 या वर्षात अहमदाबादमधील लिंग परिवर्तानाचा आकडा हा 1000 च्या वर पोहोचला आहे. वर्षभरात 50-60 जणांनी लिंग परिवर्तनाबाबत चौकशी केली आहे.

अहमदाबादधील वरिष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कॉर्पोरेट हॉस्पिटलमधील या सर्जरीची किंमत ही 8 लाख रुपयांपर्यंत आहे. अनेक लोक असे असतात जे आपली ओळख लपवण्यासाठी ही सर्जरी युरोपमध्ये करतात. परंतु आता मात्र ट्रेंड बदलताना दिसत आहे. अहमदाबादमध्येच 15 दिवसात 6 जणांनी सर्जरी केली आहे.

जन्मानं पुरुष परतु मनानं मात्र महिला
ज्या पुरुषांना लिंग परिवर्तन करण्याची इच्छा असते ते असे पुरुष असतात जे जन्मानं मात्र पुरुष असतात परंतु मनानं ते महिला असतात. म्हणजेच ते स्वत:ला महिलेसारखं मानतात आणि त्यांना महिलांप्रमाणेच राहवंसं वाटतं. त्यांना असं राहणं जास्त आवडत देखील. परंतु कुटुंबाला याबाबत सांगताना ते धजावत नाहीत. परंतु काही पुरुष असेही आहेत जे याबाबत उघडपणे बोलतात. त्यांना याबाबत बोलण्यात काहीच अडचण वाटत नाही.