‘लिंग’ बदलून ‘ललित साळवे’नं सुरु केली नवी इनिंग, थाटात केले लग्न

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – महिला पोलिस कर्मचारी ललिता साळवे हिने शरीरातील हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान लिंगबदलाची शस्त्रक्रिया केल्यानंतर ललिता साळवेची आता नवी इनिंग सुरु झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा पुरुष झालेल्या ललित साळवे याने औरंगाबाद जिल्ह्यातील सीमाशी (नाव बदलले आहे) संसार थाटला आहे.

सध्या माजलगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये ललित साळवे कार्यरत आहे. तो रविवारी बौध्द विवाह पद्धतीने विवाहबद्ध देखील झाला. दरम्यान त्यांचा विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला आहे. सध्या सीमा ही बीएच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. सीमा ही औरंगाबादमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. ललितने आपल्या सुखी संसाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला आहे. दरम्यान या सोहळ्याला सर्व नातेवाईक मंडळींनी हजेरी लावली आणि या नवदांपत्याला भावी आयुष्याच्या खूप शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

अधिक माहिती अशी की बीड पोलिस दलातील कर्मचारी ललिता साळवे हिने आपल्या शरीरातील हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला परवानगी दिली होती. महाराष्ट्र पोलिस दलातील ही पहिलीच अशी घटना समोर आली. सध्या ललिता साळवे हिने लिंगबदल करून लग्न केली असल्याने राज्यभर हा विषय चर्चेचा ठरत आहे. ललिता साळवे हिनं मोठी प्रशासकीय लढाई लढून हे यश मिळवले आणि विवाहबद्ध होत संसाराचे जोडीदारासोबत पाहिले पाऊल यशस्वीपणे टाकले.

सध्या माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथे ललित साळवे हा गुण्यागोविंदाने संसार करणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा ललिताचा ललित असा कागदोपत्री देखील बदल करण्यात आला असून ललित संपूर्णपणे तंदरूस्त असल्याचा अहवाल वैद्यकीय खात्याने दिला होता. तब्बल एक वर्षानंतर खूप संघर्षाला सामोरे जात ललित साळवे याने रविवारी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. त्याला राज्यभरातून लोक शुभेच्छा देत आहेत.