Genelia Deshmukh | तुला कोणती भूमिका करायला आवडेल? जेनेलियाला विचारताच तिने दिले ‘हे’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Genelia Deshmukh | अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. जिनिलियाने अभिनेता-पती रितेश देशमुखच्या पहिल्या दिग्दर्शित वेड (Ved Movie) या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. या चित्रपटात जिनिलियाने श्रावणी या अत्यंत सहनशील, समजूतदार आणि खंबीर पत्नीची भूमिका साकारली आहे. तिने तब्बल 10 वर्षांनंतर चित्रपटात पुनरागमन केलं आहे. (Genelia Deshmukh)
जिनिलियाने मॉडेलिंगच्या माध्यमातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 2003 साली तिने ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘चान्स पे डान्स’, ‘फोर्स’, ‘तेरे नाल लव हो गया’, ‘जय हो’ अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत तिने काम केलं आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर जिनिलियाने आता ‘वेड’च्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. (Genelia Deshmukh)
या सिनेमाची ती निर्मातीदेखील आहे. एका मुलाखती दरम्यान जिनिलियाला वेडनंतर कोणती भूमिका करायला आवडेल असं विचारण्यात आल्यानंतर तिने दिलेलं उत्तर अत्यंत कौतुकास्पद होत.
यावेळी बोलताना जिनिलिया म्हणाली, ‘मी आता वयाच्या दुसऱ्या टप्प्यावर पोहोचली आहे.
याआधी मी कॉलेज गर्ल लव्हस्टोरीसारख्या भूमिका केल्या आहेत. आणि त्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्यादेखील .. ‘.
मात्र आता वयाच्या पस्तीशीनंतर मला माझ्या वयाला साजेश्या भूमिका मिळाव्या असं वाटतं.
वयाच्या त्या टप्प्याला साजेशा भूमिका प्रेक्षकांना जास्त जवळच्या वाटतील असं जिनिलिया म्हणाली.
Web Title :- Genelia Deshmukh | ved actress genelia deshmukh wants this types role in future
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Health Tips | रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका या 5 वस्तू, आरोग्याला होऊ शकते हे मोठे नुकसान
Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान