Genelia Dsouza | जेनेलियाच्या ‘परी’सारख्या मोहक रुपानं चाहत्यांचं जिंकलं मन, पाहून तुम्हीपण व्हाल थक्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Genelia Dsouza | सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसूजा-देशमुख अनेक दिवसांपासून बॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेपासून लांब आहे. तरीदेखील जेनेलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय पाहायला मिळते. दोन मुलांची आई बनून देखील ती सुंदर आणि फिट आहे. (Genelia Dsouza) ती नेहमीच तिच्या क्यूटनेसनं चाहत्यांच मन जिंकून घेते.

 

 

जेनेलियानं नुकताच सोशल मीडियावर काही फोटोस आणि व्हिडिओ शेअर केले आहे. ज्यामध्ये तिनं वर एक क्रॉप टॉप आणि खाली लॉंग स्कर्ट घातला आहे. अनेक चाहते तिच्या या व्हिडिओ आणि फोटोंच कौतुक करताना दिसत आहे. इंन्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटो, व्हिडिओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून, तिच्या निरागसतेनं नेटकऱ्यांना मोहून टाकलं आहे. (Viral Video ) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आधी तिनं ब्लू टी शर्ट आणि खाली काळ्या रंगाची पॅंन्ट परिधान केली असून काही सेकंद मधेच तिनं आपला लूक चेंज करत, आपल्या स्टाईलनं प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. या लूकमध्ये जेनेलिया अगदीच एखाद्या परीसारखी दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 

 

 

दरम्यान, जेनेलिया डिसूजा-देशमुखने (Genelia Dsouza) ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटांमधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.
तसेच यानंतर तिनं ‘तेरे नाल लव होगया’, ‘जाने तु या जाने ना’, ‘लाईफ पार्टनर’, ‘मस्ती’ अनेक हीट चित्रपट केले.
परंतु लग्नानंतर दोन मुलं झाल्यामुळे तिनं ब्रेक घेतला.

 

 

 

Web Title :- Genelia Dsouza | genelia dsouza looking like angel in these new pics shared by her marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा