रितेशसोबत लग्नावेळी काय काय ऐकावं लागलं ?, जेनेलिया डिसूजानं केला खुलासा

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलवूड स्टार रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अॅक्ट्रेस जेनेलिया डिसूजा (Genelia D’Souza) यांनी 8 वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. आज ते बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून ओळखले जातात. जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा अनेकांनी म्हटलं होतं की, दोघं खूप लवकरच लग्न करत आहेत. लग्नावेळी तिला लोकांकडून काय काय ऐकावं लागलं याचा खुलासा आता जेनेलियानं केला आहे.

अलीकडेच्या दिलेल्या एका मुलाखतीत जेनेलिया म्हणाली, लग्नावेळी लोक तिला लग्न न करण्याचा सल्ला देत होते. लोक तिला सांगत होते की, लग्नानंतर तिचं करिअर संपेल. परंतु तेव्हा जेनेलियानं लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. कारण तिला रितेश सोबत लग्न करायचंच होतं. लग्नानंतर जेनेलिया घर आणि मुलांमध्ये बिजी झाली.

रितेश आणि जेनेलिया यांनी एकत्र हिंदी सिनेमातून डेब्यू केला होता. 2003 साली आलेला तुझे मेरी कसम हा त्यांचा पहिला सिनेमा होता. तेव्हापासून दोघं एकमेकांना डेट करू लागले. यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.

जेनेलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लग्नानंतर तिनं काही सिनेमात काम केलं आहे. जॉन अब्राहम सोबत तिनं एक सिनेमा केला होता. याशिवाय रितेशच्या एका मराठी सिनेमात तिनं कॅमिओ केला होता. आता ती निर्माती झाली आहे. आता दोघंही एकाच प्रोजेक्टवर काम करताना दिसणार आहेत.

रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो बागी 3 या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्या सोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. 6 मार्च 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसला परंतु कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं थिएटर बंद करण्यात आले आणि सिनेमाच्या कमाईला मध्येच ब्रेक लागला.

You might also like