13 वर्षाच्या मुलाचा ‘कोरोना’ व्हायरसच्या संक्रमणामुळं मृत्यू, आईला पहावा लागला ‘ऑनलाइन’ अंत्यसंस्कार

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   सध्या जग कोरोना व्हायरसचा सामना करत असून दररोज रुग्ण संख्येच्या वाढीसोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे याचा अंदाज लावला जाऊ शकतो की, या जीवघेण्या व्हायरसने जगभरात ५९ हजार लोकांचा जीव घेतला आहे. या घातक व्हायरसच्या संक्रमणाची भीती या प्रकारे आहे की, आपल्या लोकांना गमावल्यानंतरही लोकं त्यांच्या अंत्य संस्कारात सहभागी होऊ शकत नाहीत. ब्रिटनच्या एका आईचे दुःख कोणी समजू शकत नाही, जिने केवळ आपल्या १३ वर्षाच्या मुलाला कोरोना व्हायरसमुळे गमावलेच नाही तर आयजोलेशन मध्ये असल्यामुळे ती आपल्या मुलाच्या अंत्य संस्कारात देखील सहभागी होऊ शकली नाही.

ऑनलाईन पाहिले अंत्य संस्कार

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील १३ वर्षाच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशात सर्वात कमी वयात जीव गमावणाऱ्या या मुलाच्या आईला आणि इतर ६ भावंडांनाही आयजोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, ब्रिक्सन येथे राहणारा इस्माईल याचा सोमवारी मृत्यू झाला असून आरोग्य विभागाने आईला आयजोलेशनमध्ये ठेवले होते. अशा परिस्थितीत तिला आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारात भाग घेता आला नाही आणि अंत्यसंस्कार ऑनलाईन पाहण्यास भाग पडले.

अंत्य संस्कारा दरम्यान काहीच नातेवाईकांना सहभागी होऊ दिले. यादरम्यान सगळ्यांना प्रोटेक्टिव्ह सूट घातले गेले आणि त्यांना २-२ मीटर अंतरावर उभे राहण्याचे आदेश दिले गेले होते.

आई आणि २ मुलांमध्ये संक्रमणाची लक्षणे

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या इस्माइलची आई आणि त्याच्या २ बहीण-भावामध्ये देखील कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. सध्या पूर्ण कुटुंबाला घरातच आयजोलेशनमध्ये ठेवले गेले आहे.

इटलीमध्ये अंतिम संस्कार कार्यक्रमावर बंदी

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका असलेल्या देशांमध्ये इटली देखील आहे. या धोकादायक व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो लोक मरण पावले असून परिस्थिती इतकी अनियंत्रित झाली आहे कि वैद्यकीय सुविधाही अगदी कमी पडत आहेत. मरणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे की, त्यांच्या अंत्य संस्कारांसाठी कब्रिस्तान देखील पडू लागले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता सरकारने मृतांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमावरच बंदी घातली आहे.