Coronavirus : डॉक्टरच्या प्रेग्नंट पत्नीला झालं होतं ‘कोरोना’चं संक्रमण, दिला अशा मुलाला जन्म

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोनाची मोठी भीती आहे. कोरोनाचे संक्रमण नवजात बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वांना होते. यामुळे हे संक्रमण भयानक वाटत आहे कारण आतापर्यंत देशात 58 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे आणि यावर अद्याप कोणतेही वॉस्कीन देखील बाजारात आले नाही.

दिल्लीतील डॉक्टर देखील कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. चिंता तेव्हा वाढली की जेव्हा त्यांच्या गर्भवती पत्नीला कोरोनाचे संक्रमण झाले. दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील रहिवासी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला कोरोना झाला. नुकतीच डॉक्टरांच्या पत्नीची डिलीवरी झाली. कुटूंबीयांसाठी हे आनंदाचे ठरले की नवजात बाळाला कोरोनाची लागण झाली नाही.

देशातील पहिले प्रकरणं
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, देशातील हे पहिले प्रकरण आहे की जेव्हा पती पत्नी दोघांना कोरोना झाला म्हणून कोरोना व्हायरस झाला परंतु संक्रमित महिलेने तंदुरुस्त मुलाला जन्म दिला. रेसिडेंट डॉक्टर एम्सच्या फिजिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. AIIMS चे अधीक्षक डॉ. डीके शर्मा म्हणाले होते की शुक्रवारी रात्री एका आईने निरोगी मुलाला जन्म दिला. डिलीवरी दरम्यान डॉक्टरांकडून प्रोटोकॉलचे पालन केले. सर्वांना पीपीई किट देण्यात आले होते आणि उपकरणांना डिसइन्फेक्टेड करण्यात आले होते.

डिलीवरी टीमचे प्रमुख डॉ. नीरजा बाटला म्हणाल्या की डिलीवरीच्या काही तासांआधी कळाले की महिला पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर तिला तात्काळ आयसोलेशन वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आणि एक ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले. जेथे महिलेने एका निरोगी बाळाला जन्म दिला.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की आई आणि मुलं ठीक आहे. आम्ही दोघांची देखभाल करत आहोत. आम्ही नंतर ठरवू की मुलाचे नमुने घ्यायचे की नाही. आई कोरोनाग्रस्त आहे परंतु मुलाला दूध पाजू शकते कारण कोरोना दूधातून पसरत नाही.