Coronavirus : पतंजलीनं ‘कोरोनिल’ औषधापासून ‘कोरोना’चा उपचार करण्याच्या आपल्या दाव्याकडं फिरवली पाठ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पतंजली योग पीठ कोरोना विषाणूचे औषध बनवण्याच्या आपल्या दाव्यापासून मागे हटले आहे. पतंजलीने असा दावा केला होता की त्यांचे औषध कोरोनिलमुळे कोरोना विषाणूवर उपचार करणे शक्य आहे. उत्तराखंड आयुष विभागाने सोमवारी पाठविलेल्या नोटीसला पतंजली योग पीठाने प्रतिसाद दिला. आयुष विभागाला पाठविलेल्या उत्तरात पतंजलीने पूर्वीच्या दाव्यांकडे पाठ फिरविली आहे.

गेल्या मंगळवारी कोरोनिलच्या लॉंचिंगच्या वेळी योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनिल, श्वासारी वटी आणि अणु तेलाने कोरोनाचा उपचार करण्याचा दावा केला होता. यावर उत्तराखंड आयुष विभागाने पतंजलीला 24 जून रोजी नोटीस बजावली. पण आता पतंजलीने आपल्या दाव्याकडे पाठ फिरविली आहे.

उल्लेखनीय म्हणजे योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी हरिद्वार येथे पत्रकार परिषद घेऊन कोरोनिल नावाच्या या आयुर्वेदिक औषधाबद्दल स्पष्टीकरण दिले होते. यावेळी बाबा रामदेव यांनी पतंजली आयुर्वेदाची औषधी दिव्य कोरोनिल टॅबलेटच्या कोरोना बाधित रूग्णांवर क्लिनिकल चाचण्यांचे निकाल देखील जाहीर केले होते. येथे पतंजली योगपीठाने असा दावा केला आहे की कोरोना टॅबलेटवर झालेले हे संशोधन पतंजली संशोधन संस्था हरिद्वार आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जयपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले आहे. बाबा रामदेव त्यावेळी म्हणाले होते की या औषधीमध्ये फक्त देशी वस्तू वापरल्या गेल्या आहेत. या औषधामध्ये मुलैठी, काढासहित गिलोय, अश्वगंधा, तुळशी, श्वासारी चा वापर करण्यात आला आहे.

मात्र आता उत्तराखंड आयुष विभागाने पाठविलेल्या नोटीसला उत्तर देताना पतंजलीने या दाव्याकडे पाठ फिरविली आहे. असे म्हटले जात आहे की प्रत्युत्तरात पतंजलीने असे लिहिले की त्यांनी केव्हाच कोरोनावर उपचाराचा दावा केला नाही. त्यांनी केवळ आयुर्वेद औषध कोरोनिल टॅबलेटच्या कोरोना संक्रमित रूग्णांवर क्लिनिकल चाचणीच्या परिणामांची माहिती दिली. या औषधाच्या वापराचा कोरोना संक्रमितांवर बऱ्याच प्रमाणात सकारात्मक परिणाम झाला होता.