महिला आणि मुलींना मोदी सरकार देतंय ‘सूट’ आणि ‘लाभ’, जाणून घ्या सरकारी योजनांबाबत सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात 27 सप्टेंबर, रविवारी डॉटर्स डे म्हणजे कन्या दिन साजरा केला जाईल. प्रत्येक वर्षी यादिवशी सरकारी स्तरावर कार्यक्रम होतात. शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी उपक्रम आयोजित केले जातात. यामध्ये प्रामुख्याने मुलींना सरकारकडून देण्यात येणार्‍या सुविधा आणि त्या सरकारी योजनांबाबत सांगितले जाते, ज्यामध्ये मुली आणि महिलांना विशेष सूट, लाभ दिले जातात. अनेक महिला आणि कन्यांना आजही या योजनांबाबत माहिती नाही. आज आपण या योजनांबाबत माहिती घेवूयात…

बँकिंग सेक्टर : कमी व्याजाची ऑफर, हे आहेत लाभ
बहुतांश बँकिंग, विना बँकिंग संस्थांकडे पुरूषांच्या तुलनेत महिलांना कमी व्याजदरावर होम लोनच्या ऑफर्स आहेत. पुरूषांच्या तुलनेत महिलांना 0.05% कमी व्याज लावले जाते.

या योजनांमध्ये मिळते कमी व्याजावर लोन
महानगरांमध्ये महिलांसाठी रियल इस्टेट योजनांमध्ये सवलतीच्या दरा व्याजदरात होम लोन उपलब्ध असते. होम लोन देणार्‍या अनेक कंपन्या पंतप्रधान आवास योजना, एचडीएफसी वूमन पॉवर यासारख्या योजनांच्या अंतर्गत हे लोन देतात.

पंतप्रधान आवास योजना
पंतप्रधान आवास योजनेत महिलांसाठी अनेक लाभांची तरतूद आहे. यामध्ये विधवा, निराधार महिला, एससी-एसटी वर्गातील महिला, दिव्यांग, नोकरदार महिलांना प्राधान्य दिले जाते. महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यावर सरकारकडून सुमारे अडीच लाख रूपयांची सबसिडी मिळते, पण घर पहिलेच असायला हवे.

या योजनेसाठी अशा आहेत अटी
* महिला लाभार्थ्याचे वय 70 वर्षापर्यंत असावे.
* इडब्ल्यूएसचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असावे.
* एलआयजीचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रूपये असावे.
* एमआयजीचे वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 18 लाख असावे.
* महिला लाभार्थ्याच्या कुटुंबाकडे देशात कुठेही अन्य संपत्ती नसावी.

एचडीएफसी बँकेची वूमन पॉवर स्कीम
एचडीएफसी बँकेच्या वूमन पॉवर योजनेंतर्गत महिलांना 9.85 वार्षिक व्याजदराने होम लोन मिळते. मात्र, या संपत्तीची एकमात्र मालकी महिलेची असावी. ज्यांच्याकडे स्वताचा आर्थिक स्त्रोत नाही अशा महिलांसाठी सुद्धा ही योजना उपयोगी आहे.

व्याजदरात 0.5 टक्केची सूट
एचडीएफसीच्या या योजनेत महिलांना होम लोनवर 0.5 टक्केची सूट दिली जाते.

महिलांसाठी आहेत इतक्या होम लोन योजना
SBI Home Loan, HDFC Home Loan, ICICI Home Loan, Axis Home Loan, DHFL, Bank of Baroda Home Loan, LIC Home Loan, UCO Bank Home Loan and Vijaya Bank Home Loan आदि प्रमुख योजना महिलांसाठी आहेत. या योजनांमध्ये महिलांकडे भरपूर ऑपशन आहेत.

स्टॅम्प ड्यूटीत सूट
– जर एखाद्या महिलेने संपत्ती खरेदी केली तर सामान्यपणे तिला स्टॅम्प ड्यूटीत एक किंवा दोन टक्क्यांची सूट मिळते.

टॅक्समध्ये हे रिबेट
ज्या महिला होम लोन घेत आहेत, त्यांना सरकारकडून टॅक्समध्ये सूट देण्याची तरतूद आहे. महिलांना मुळ रक्कम आणि व्याजावर लागणार्‍या एकुण टॅक्समध्ये 2 लाख रूपयांपर्यंत सूट मिळते.

महिला अर्जदार असल्यास लोनमध्ये मिळतो हा लाभ
अनेक बँका आणि वित्तसंस्था महिलांना लोन स्कीमध्ये विविध लाभ देतात. कर्जासाठी अर्जदार महिला असल्यास लोन मंजूर होण्याची शक्यता जास्त असते. जर महिला अर्जदार असेल तर चांगल्या व्याजदरात बँका लोन देतात. या सुविधा नोकरदार आणि हाऊस वाईफ दोघींना मिळते.

नववधूला 10 ग्रॅम सोने देण्याची घोषणा
आसामध्ये सुरू झालेल्या अरुंधती गोल्ड स्कीमअंतर्गत राज्य सरकार काम करण्यास सुरूवात केली आहे. राज्य सरकार या अंतर्गत 40,000 नव दाम्पत्यांना आर्थिक सहाय्य करणार आहे. अरुंधती सुवर्ण योजनेंतर्गत लाभार्थींना आर्थिक सहाय्य प्रदान केले जात आहे. राज्य सरकार अरंधित स्वर्ण योजनेतून नववधूला 10 ग्रॅम सोने देणार आहे. सरकार या योजनेवर 800 कोटी खर्च करणार आहे. नववधू प्रौढ असणे, विवाह नोंदणी करणे, वधूच्या कुटंबाचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असणे इत्यादी अटी यासाठी आहेत.

पंतप्रधान उज्ज्वला योजना
ही योजना खास महिलांसाठी आहे. या योजनेत महिलांना गॅस कनेक्शन पूर्णपणे मोफत दिले जाते. जवळच्या गॅस एजन्सीकडे गेल्यास योजनेची पूर्ण माहिती मिळू शकते.

सुकन्या समृद्धी योजना
केंद्र सरकारच्या या योजनेत जन्मापासून दहा वर्षाच्या मुलींचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले जाते. यासाठी एक हजार रुपये जमा करावे लागतात. मुलींच्या शिक्षणासाठी बचत करणे हा योजनेचा हेतू आहे.

अमेठीत 500 महिलांना असा मिळणार रोजगार
ग्रामीण महिलांना रोजगाराशी जोडण्यासाठी आणि स्थानिक कच्च्या मालावर आधारित उत्पादन तयार करण्यासाठी कटरा महाराणीच्या संदीप सिंह यांनी 500 महिलांचा गट तयार केला आहे. यात महिला आयुर्वेदिक लिंबू आणि तुळशी पावडरसह कॉटन बॅग, डिझायनर पायपुसणी आणि शर्ट तयार करत आहेत. जुन्या साड्यांपासून तयार कॉटनच्या 600 पायपुसणी खरेदीची ऑर्डर सुद्धा या महिलांना मिळाली आहे.