या महिन्यात ‘चंद्र’ आणि ‘सूर्यग्रहण’ दोन्ही दिसतील, जाणून घ्या त्यांच्याशी संबंधित खास माहिती

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना संकटाच्या दरम्यान जून महिन्यात एकाच वेळी दोन ग्रहण लागण्याची शक्यता आहे. जून महिन्यात सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही लागणार आहेत. एक ग्रहण महिन्याच्या सुरूवातीला आणि दुसरे महिन्याच्या शेवटी असणार आहे. 5 जूनला चंद्रग्रहण आणि 21 जूनला सूर्यग्रहण असणार आहे.

चंद्रग्रहण

चंद्रग्रहण एका खगोलशास्त्रीय घटनेवर आधारित आहे. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत असतात तेव्हा पृथ्वीच्या स्थितीच्या आधारावर सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण अशा वेळी लागते जेव्हा संपूर्ण चंद्र दिसत असतो आणि पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते. अशा प्रकारे सूर्याचे किरण थेट चंद्रावर पोहोचत नाहीत. हे तेव्हाच होते जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते.

मिळालेल्या माहितीनुसार 2020 मध्ये चार चंद्रग्रहण झाले आहेत. एक जानेवारीत झाले असून उर्वरित ग्रहण जून, जुलै आणि नोव्हेंबरमध्ये लागणार आहेत. 5 जून रोजी होणारे चंद्रग्रहण उपछाया ग्रहण असेल. याचा अर्थ चंद्र पृथ्वीच्या हलक्या सावलीतून जाईल.

5 जूनला यावेळी लागणार चंद्रग्रहण

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेची तारीख 5 जून शुक्रवारी आहे. या दिवशी होणारे चंद्रग्रहण 3 तास 18 मिनिटांचे असेल. हे चंद्रग्रहण 5 जून रोजी रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि 6 जून रोजी सकाळी 12 वाजून 54 मिनिटापर्यंत त्याच्या कमाल ग्रहणापर्यंत पोहोचेल. उपछाया चंद्रग्रहण 6 जून रोजी 2 वाजून 34 मिनिटांनी संपेल. हे ग्रहण आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका येथील रहिवासी पाहू शकतात. तथापि, उपछाया चंद्रग्रहणामुळे सामान्य चंद्र आणि ग्रहण चंद्र यांच्यात फरक करणे लोकांना कठीण जाईल.

हे ग्रहण संपूर्ण भारतभर पाहिले जाऊ शकते, परंतु या ग्रहण काळात चंद्राच्या आकारात कोणताही बदल होणार नाही. तो पूर्ण आकारात आकाशात फिरताना दिसणार आहे. या ग्रहणकाळात चंद्राची प्रतिमा मंदावलेली दिसेल. यामागचे कारण हे आहे की ते प्रत्यक्ष चंद्रग्रहण नाही, तर हे उपछाया चंद्रग्रहण आहे. यापूर्वी 10 जानेवारी रोजीही असेच चंद्रग्रहण लागले होते.

सूर्यग्रहण

सूर्यग्रहण खगोलशास्त्रीय घटनेवर आधारित आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधोमध चंद्र आल्यामुळे सूर्यग्रहण लागते. या काळादरम्यान चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि ज्या ठिकाणी ही सावली पडते तिथे अंशतः अंधार होतो. अशा वेळी सूर्याला उघड्या डोळ्यांनी पाहू नये. यावर्षी 21 जून रोजी सूर्यग्रहण होईल.

21 जूनला यावेळी सूर्यग्रहण होईल

2020 या वर्षातील एकमेव सूर्यग्रहण रविवारी 21 जून रोजी होणार आहे. 21 जून रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी हे ग्रहण सुरू होईल. या ग्रहणाचे परमग्रास 99.4 टक्के असेल म्हणजेच काही ठिकाणी सूर्य पूर्णपणे लपलेल्या स्थितीत असेल. हे ग्रहण सुमारे 5 तास 48 मिनिटे 3 सेकंद राहील. या ग्रहणाचा व्यापक परिणाम भारत, दक्षिण पूर्व युरोप, आफ्रिका, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान या देशांवर दिसून येईल.