भारतीय लष्कराच्या ‘पोर्टर’चे शीर कापून घेवून गेली PAK ची BAT, लष्कर प्रमुख म्हणाले – उत्तर देणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने (BAT) शुकवारी पुंछ जिल्ह्याजवळील नियंत्रण रेषे (LoC) वर भारतीय लष्कराच्या दोन पोर्टरची हत्या केली. तसेच एका पोर्टरचे शीर कापून बॅट घेऊन गेली. यावर भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमच्या निंदनीय कृत्यावर टीका करताना भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले, प्रोफेशनल आर्मी कधीही भ्याड कृत्यांचा आधार घेत नाही. अशा स्थितीला लष्करी नियमानुसार सामोरे गेले पाहिजे.

पाकिस्तानी लष्काराच्या भ्याड कृत्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जनरल नरवणे म्हणाले, भारतीय लष्कर एलओसीवरही प्रोफेशनल पद्धतीने आणि नैतिकतेने काम करते. प्रोफेशनल आर्मी कधीही भ्याड कृत्यांचा आधार घेत नाही. पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने लष्कराच्या पोर्टरची हत्या करून त्याचे शीर घेऊन जाण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे.

या बॉर्डर अ‍ॅक्शन टीममध्ये पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी सहभागी झाले होते. यापूर्वी पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने भारतीय लष्कराच्या जवानांचे शीर कापून नेल्याची निंदनीय घटना घडली होती. एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, 28 वर्षीय मोहम्मद असलमचा मृतदेह अतिशय वाईट स्थितीत सापडला आणि त्याचे शीर गायब होते. त्याचे शीर BAT कापून घेवून गेली.

लष्करासाठी रसद घेऊन जात होते पोर्टर, PAK च्या लष्कराने केला हल्ला

एका सुरक्षा प्रवक्त्याने सांगितले की, मोहम्मद असलम आणि 23 वर्षीय अल्ताफ हुसैन गुलपुर सेक्टरमधील कसालियन गावातील राहणारे आहेत. त्यांची पाकिस्तानी लष्कराने हत्या केली. पाकिस्तानी लष्कराने भारतीय लष्कराच्या पोर्टरवर दोन मोर्टरसुद्धा डागले, ज्यामध्ये लष्कराचे तीन पोर्टर जखमी झाले आहेत. हे पोर्टर एलओसीजवळ भारतीय लष्करासाठी रसद घेऊन जात असताना शुक्रवारी पाकिस्तानी लष्कराने त्यांच्यावर हल्ला केला.

पाकिस्तानी लष्कराच्या मोर्टार हल्ल्यात 3 लष्करी पोर्टर जखमी

पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, मोहम्मद असलमचा शीर नसलेला मृतदेह पोलिसांकडे सोपवण्यात आला. यानंतर कायदेशीर कारवाई करून पोर्टर्सचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान लष्कराच्या मोर्टार हल्ल्यात तीन लष्करी पोर्टर जखमी झाले आहेत, त्यांची नावे 24 वर्षीय मोहम्मद सलीम, 28 वर्षीय मोहम्मद शौकत आणि 35 वर्षीय नवाज अहमद अशी आहेत.

पाकिस्तानला उत्तर कधी देणार : काँग्रेस

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लष्कराच्या पोर्टरच्या हत्येचा निषेध केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याला उत्तर कधी देणार ते सांगावे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/