कारगिल युद्धावेळी इतर देशांनी भारताला लुबाडलं : लष्करप्रमुख व्ही.पी. मलिक

चंदीगड : वृत्तसंस्था – कारगिल युद्धावेळी इतर देशांनी भारताला लुबाडलं. कारगिल युद्धावेळीभारताला मोठ्या प्रमाणात विदेशातून शस्त्रसाठा, दारुगोळा मागवावा लागला होता. त्यावेळी इतर देशांनी मदत करण्याऐवजी प्रचंड पैसा उकळला आणि 3 वर्ष जुने सॅटेलाइट फोटो भारताला दिले होते. अशी माहिती भारतीय लष्कराचे तत्कालीन प्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांनी दिली आहे. ते मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात बोलत होते.

कारगिल युद्धाविषयी खुलासे करताना जनरल व्ही.पी. मलिक म्हणाले की, ‘कारगिल युद्धावेळी भारताला शस्त्रसाठा आणि दारुगोळ्याची नितांत गरज होती. त्यामुळे इतर देशाकडून आपण ही मागणी केली. त्यावेळी या देशांनी भारताला मदतीच्या नावावर जुनी झालेली शस्त्र सोपविली. भारताचं जितकं शोषण करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न या देशांनी केला.

आम्ही एका देशाकडून तोफा मागितल्या होत्या. त्या देशाने सुरुवातील तोफा देण्याचं आश्वासन दिलं पण नंतर जुन्या तोफांची दुरुस्ती करुन भारताला पाठविल्या. दारुगोळाची गरज असताना भारताने अन्य एका देशाची संपर्क साधला असता त्यांनी 1970 च्या दशकातील दारुगोळा भारताला दिला होता. त्याचसोबत सॅटेलाइट फोटोसाठी भारताला प्रत्येकी 36 हजार रुपये द्यावे लागले होते. इतके पैसे देऊनही भारताला 3 वर्ष जुने सॅटेलाइट फोटो देण्यात आले होते. ‘

कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये 1999 साली झाले होते. कारगिल सेक्टरमध्ये आलेल्या घुसखोरांना सीमेपार करण्यासाठी हे युद्ध झाले होते. दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य यांना शोधून काढण्यासाठी प्रथमच हवाई दलाचा वापर करण्यात आला. कारगिल युद्ध हे समुद्रसपाटीपासून अत्यंत उंच प्रदेशात लढले गेल्याने असे युद्ध लढण्यासाठी अत्यंत अवघड समजले जाते. ऑपरेशन यशस्वी झाल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 14 जुलै रोजी जाहीर केले. 26 जुलै रोजी ऑपरेशन विजय अधिकृतरित्या संपल्याचे जाहीर करण्यात आले. व्ही.पी.मलिक कारगिल युद्धाच्यावेळी लष्करप्रमुख होते. कारगिल युद्धाविषयी माहिती देणारी पुस्तकेही त्यांनी लिहली आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

You might also like