PAK : गायीच्या शेणापासूनच्या उर्जेवर कराचीत धावणार बसेस, महिला मंत्र्याने सांगितला ‘प्लॅन’ (व्हिडीओ)

कराची : वृत्तसंस्था – गायीच्या शेणापासून तयार झालेल्या उर्जेवर कराचीमध्ये बसेस चालवण्याचा प्रस्ताव पाकिस्तानच्या महिला मंत्री जरताज गुल यांनी संसदेत मांडला आहे. यासंदर्भात माहिती देताना जरताज गुल यांनी सांगितले की, देशात आयात केल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये 5 टक्के प्रमाण सल्फरचं असल्याचं त्यांनी सांगितले.

जरताज गुल यांनी संसदेत बोलताना सांगितले की, बलुचिस्तान सीमेवर कारवाईनंतर 1100 पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहे. सध्या देशात 1800 पेट्रोल पंप बेकायदेशीरपणे सुरु आहेत. प्रदूणावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात गायीच्या शेणापासून तयार केलेल्या उर्जेवर बसेस चालवण्याचा प्रस्ताव त्यांनी संसदेत मांडला आहे.

याशिवाय इस्लामाबादमधील लोखंडाच्या कारखान्यावर, औद्योगिकीकरणामुळे होणाऱ्या प्रदूषणावरही नजर ठेवली जात असल्याचेही त्यांनी सांगितलं.