‘नूतन’मध्ये भूगोल दिनानिमित्त प्रदर्शन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील नुतन विद्या प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच भूगोल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनाचे औचित्य साधून इयत्ता ४ थी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी शालेय पाठावर आधारित विविध उपकरणे तयार करून त्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सूर्यमाला, सूर्यग्रहण व चंद्रग्रहण, भूभागाचे विविध रूपे, दिवस-रात्र चक्र, ज्वालामुखीचे उद्रेक, जलविद्युत प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पवनचक्की, मिठागरे, खडकांचे विविध प्रकार, समूद्रातील तेलगळती, ग्रीन हाऊस, शेतीपूरक व्यवसाय, पर्यटन, विविध भौगोलिक उपकरणांचा वापर व मापन घेण्याचे तंत्र, भूकंपाची तीव्रता मोजण्याची पद्धती, शहरीकरण, व्यापार, नकाशावाचन इत्यादी संकल्पनांवर आधारित उपकरणे तयार केली होती.

या प्रदर्शनाला शिक्षक-पालक समितीच्या सदस्या श्वेता मालपाणी, पुनम आलीझाड, प्रमिला शिंदे, निलेश देसाई व पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रयोगशिलतेचे कौतुक केले. याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक व जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर व शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन संदीप होळकर, प्राचार्य सत्तार शेख, सर्व विभागप्रमुख व शिक्षक उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी भूगोल शिक्षिका मंजू वाधवा, प्रियदर्शनी गायकवाड, वैशाली जाधव व रेखा दरेकर आदींनी परिश्रम घेतले.

फेसबुक पेज लाईक करा –