अमेरिकेत पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लायड प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत वारंवार आंदोलने होत आहेत. पोलिस कोठडीत हा मृत्यू झाल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेकडे गेले. याच दरम्यान जॉर्ज फ्लॉयडविषयी आणखी एक खुलासा असा झाला की, त्याला एप्रिलमध्ये कोरोना विषाणूची लागणही झाली होती. मिनियापोलिसमध्ये पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या जॉर्ज फ्लॉयडचा पोस्टमार्टम रिपोर्ट बुधवारी जाहीर झाला. फ्लॉयड कोविड-१९ ने संक्रमित असल्याचेही उघड झाले. हेनेपिन काउंटी यांच्या वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने फ्लॉयडच्या कुटुंबाच्या परवानगीनंतर २० पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, मुख्य वैद्यकीय परीक्षकाच्या अहवालात असेही म्हटले आहे की फ्लॉइड ३ एप्रिल रोजी कोविड-१९ ने संक्रमित आढळला होता, पण त्याच्यात आजाराची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, फ्लॉयडचे हृदय निरोगी असल्याचेही सांगितले होते. पण त्याच्या मृत्यूमागील कारण संक्रमण देखील असल्याचे कोणतेही संकेत आढळले नाहीत. जॉर्ज फ्लॉयडला २५ मे रोजी मिनियापोलिसमध्ये दुकानाबाहेर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्याचा मृत्यू झाला. अटकेच्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये त्याला एका पांढऱ्या पोलिस अधिकाऱ्याने डेरेक शोविनने अटक केले होते. जॉर्जच्या गळ्यावर गुडघा दाबणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर थर्ड डिग्री हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅक्सीमधून जॉर्ज फ्लॉयडला खाली उतरवून जमिनीवर ठेवले आणि त्याची मान गुडघ्याने दाबली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हापासून संपूर्ण अमेरिकेत आंदोलने होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉर्जवर आरोप होता की त्याने २० डॉलर (सुमारे १५०० रुपये) च्या बनावट नोटच्या माध्यमातून दुकानातून खरेदी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की, जॉर्जने अटकेचा शारीरिक स्वरूपात विरोध केला, त्यानंतर शक्तीचा वापर करण्यात आला.